जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / संजय राऊतांचा गौप्यस्फोट, सुभाष देसाईंच्या मुलाने ठाकरे गट सोडण्याची सांगितली INSIDE STORY

संजय राऊतांचा गौप्यस्फोट, सुभाष देसाईंच्या मुलाने ठाकरे गट सोडण्याची सांगितली INSIDE STORY


'सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाही.

'सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाही.

‘शिंदे गटामध्ये सामंत लोणीवाले हे मंत्री आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी देसाईंच्या चिरंजीवांवर आरोप केले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च : सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाही. काही दिवसांपूर्वी सामंत लोणीवाले आहे, जे उद्योगमंत्री आहे, त्यांनी देसाईंच्या मुलावर जे आरोप केले होते, त्याचं काय झालं? याचे उत्तर द्या, असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुभाष देसाई यांच्या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाही. सुभाष देसाई यांनी एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यांचा मुलगा शिवसेनेमध्ये कधीही सक्रिय नव्हता. शिंदे गट कधी बाप पळवत होते, आता मुलं पळवत आहेत. त्यांची भरती कुचकामी आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ‘शिंदे गटामध्ये सामंत लोणीवाले हे मंत्री आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी देसाईंच्या चिरंजीवांवर आरोप केले होते. आता हेच ते चिरंजीव आहे. एवढंच नाहीतर त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले होते. आता त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांनी वॅाशिंग मशिन मधून चिरंजीवांना स्वच्छ करून बाजूला घेऊन बसले आहे. हा भाजपच्या वॅाशिंग मशिनचा परिणाम आहे. काही दिवसांपूर्वी सामंत लोणीवाले आहे, जे उद्योगमंत्री आहे, त्यांनी जे आरोप केले होते, त्याचं काय झालं? याचे उत्तर द्या, अशी मागणीच राऊतांनी केली. ‘भूषण देसाई हे काही शिवसेनेत सक्रिय नव्हते. पण या प्रवेशाचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. काही दिवसांनी मिंधे गटासमोर हा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे. भाजपपुढे हा प्रश्न असेल की, इतका कचरा आत टाकत आहे, त्यामुळे वाशिंग मशीन बिघडेल, असा टोलाही राऊतांनी लगावला. प्रकाश सुर्वे कुठे आहे? ‘जो काही व्हिडीओ आला आहे, तो व्हिडीओ खरा की खोटा याचा शोध घ्या. त्यात मॅार्फिंग झालीय का हे तपासा. ते पुरूष आमदार कुठे आहेत ? त्यांची काही तक्रार नाही का, बदनामी पुरूषाची झाली नाही का? मिंधे गटाच्या महिलेचं म्हणणं आहे की, त्यांची बदनामी सुरू आहे. पण हा व्हिडीओ लाखो कोटी लोकांपर्यंत पोहोचला मग सर्वांना अटक करणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थितीत केला. ‘शीतल म्हात्रे प्रकरणात कायद्याचा गैरवापर करत आहेत.महिलांचा सन्मान राखला पाहिजे. सभ्यपणे शब्द वापरले पाहिजे. आपण अहिल्याबाई होळकर झाशीची राणीचे नाव घेत असतो तर महिलांचा सन्मान करायला पाहिजे, असंही राऊत म्हणाले. ‘देशात लोकशाहीची हत्या होतेय. काल राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केला. राहुल गांधींना व्यासपीठ मिळाला ते बोलले. आम्हाला बोलू दिलं जात नाही. संसदेत आणि संसदेबाहेर लोकांना संपवण्याचं काम सुरू आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात