• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईत शिवसेना नगसेविकेच्या राड्यानंतर डॉक्टरांचा सामुहिक राजीनामा, या रुग्णालयातील VIDEO व्हायरल

मुंबईत शिवसेना नगसेविकेच्या राड्यानंतर डॉक्टरांचा सामुहिक राजीनामा, या रुग्णालयातील VIDEO व्हायरल

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Sandhya Doshi Viral Video on Social Media) व्हायरल होत आहे.

  • Share this:
मुंबई, 21 एप्रिल: मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Sandhya Doshi Viral Video on Social Media) व्हायरल होत आहे.  मुंबईच्या बोरीवली भागात असणाऱ्या भगवती रुग्णालयातील (Bhagwati Hospital) डॉक्टरांबरोबर भांडण करण्याचा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात संध्या दोषी डॉक्टरशी हुज्जत घालत असताना दिसत आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिका आणि संध्या दोषी यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून भगवती रुग्णालयातील डॉक्टर सामुहिक राजीनामा देत आहेत. दरम्यान शिवसेना नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भगवती रुग्णालयातील डॉक्टरांवर दोषी यांनी अपशब्द उच्चारल्याचा आरोप केला जात आहे. या व्हिडीओमध्ये त्या असं म्हणताना दिसत आहेत की, तुमच्यासारखे 10 डॉक्टर उभे करेन. दरम्यान यावेळी दोषी यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तीने रुग्णालयामध्ये येऊनही मास्क घातला नव्हता. त्यावरून देखील सोशल मीडियावर टीकेची प्रतिक्रिया उमटत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडीओ एवढंच नव्हे तर या डॉक्टरांनी असा आरोप केला आहे की, दोषी यांच रेकॉर्डिंग करणाऱ्या डॉक्टरांच्या मोबाईल मधले व्हिडीओ देखील त्यांनी डिलीट करायला लावले. या सगळ्या प्रकारानंतर डॉक्टरांनी प्रवीण दरेकर यांना पत्र लिहीत आपलं गाऱ्हाणे पण मांडलं आहे. मंगळवारी दुपारी हा सगळा प्रकार घडला.  दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेनंतर दोघांनाही समज दिले असल्याचे सांगितले आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: