मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : समीर वानखेडे मुंबईतून गाशा गुंडाळणार? NCB ने दिले मोठे संकेत

BREAKING : समीर वानखेडे मुंबईतून गाशा गुंडाळणार? NCB ने दिले मोठे संकेतअखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

अखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

अवघे 13 दिवस उरले असताना सुद्धा त्यांना मुदतवाढ देण्याबद्दल कोणतेही संकेत दिले गेले नाही.

मुंबई, 17 डिसेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला अटक प्रकरणामुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे पुरते अडचणीत सापडले. समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ अनेक गंभीर आरोप झाले. एवढंच नाहीतर एनसीबीने अनेक प्रकरण वानखेडे यांच्याकडून काढून घेतली. आता समीर वानखेडे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यांना मुदतवाढ दिली नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एवढंच नाहीतर खुद्द वानखेडे 31 डिसेंबरपासून रजेवर जाणार आहे.

NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा NCB तील कार्यकाळ 31 डिसेंबरपर्यंतचा आहे. पण आता अवघे 13 दिवस उरले असताना सुद्धा त्यांना मुदतवाढ देण्याबद्दल कोणतेही संकेत दिले गेले नाही. त्यामुळे 1 जानेवारीपासून NCB ला नवे विभागीय संचालक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

31 ऑगस्ट 2020 ला NCB विभागीय संचालक म्हणून समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारला होता.  वर्षभरात केलेल्या अनेक करवाईंनी समीर वानखेडे चर्चेत राहिले.  अवघ्या सव्वा वर्षांत त्यांनी 120 कारवाया केल्यात.  अनेक ड्रग्स तस्कर, हस्तकांना जेरबंद केले. याआधी 31 ऑगस्ट 2021 ला समीर वानखेडेंना 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.  ग्लॅमर विश्व आणि सिने इंडस्ट्री संबंधीत अनेकांवर वानखेडेंनी कारवाई केली होती.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्न कनेक्शन प्रकरणावरून रिया चक्रवर्ती, भारती सिंग,समीर खान, अरमान कोहली यांची चौकशी समीर वानखेडे यांनी केली होती. त्यांनी आतापर्यंत 324 आरोपींना अटक केली होती.

पण, नोव्हेंबर महिन्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केली होती. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे वानखेडे यांची पुरती अडचण झाली होती. एवढंच नाहीतर मुंबई उच्चन्यायालयाने सुद्धा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाही असं म्हणत समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

या प्रकरणी एनसीबी बॅकफुटवर गेली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्याकडून मुंबईतील काही प्रकरणं सुद्धा काढून घेतली होती. त्यानंतर आता मुदवाढ सुद्धा देण्यात येणार नसल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे समीर वानखेडे हे 31 डिसेंबरपासून रजेवर जाणार आहे.

First published: