Home /News /mumbai /

समीर वानखेंडेच्या जिवाला धोका? मंत्र्याच्या मुलीकडूनही पाळत ठेवल्याचा संशय

समीर वानखेंडेच्या जिवाला धोका? मंत्र्याच्या मुलीकडूनही पाळत ठेवल्याचा संशय

समीर वानखेडे यांनी या प्रकरणात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.

    मुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबईचे NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकरणात समीर यांनी महाराष्ट्राचे DGP यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय त्यांनी काही पुरावे देखील दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलिसांनी स्मशानात जाऊन समीन वानखेडे यांचा CCTV फुटेज (Allegation of taking CCTV footage of Samin Wankhede) घेतल्याचा आरोप आहे. 2015 मध्ये समीन वानखेडे यांच्या आईचं निधन झालं. तेव्हापासून दररोज समीर वानखेडे स्मशानात जाऊन आईचं दर्शन घेतात. त्यांचं सीसीटीव्ही फुटेज कुठल्या हेतूने घेण्यात आलं आहे, याबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे एका मंत्र्याच्या मुलीनेही स्मशानभूमीतून वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. स्मशान व्यवस्थापनाने याबाबत वानखेडे यांनी सूचित केले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सुरू आहे तपास... हाय प्रोफाइल क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs Party) प्रकरणात समीर वानखेडे आणि त्यांची टीम तपास करीत आहे. चार्जशीट फाइल करण्यासाठी एनसीबीच्या टीमकडे 6 महिन्यांचा अवधी आहे. यादरम्यान समीन वानखेडेचा एक्सटेंन्शन 6 महिन्यासाठी वाढवून देण्यात आला आहे. त्यांना दुसऱ्यांना एक्सटेन्शन मिळालं आहे. या हायप्रोफाइल केसच्या तपासानंतर समीन वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी जेव्हा सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्ज अँगल समोर आला होता, तेव्हा देखील समीर वानखेडे याचं नाव चर्चेत आलं होतं. समीर वानखेडेला सिंघमदेखील म्हटलं जातं. आणि बॉलिवूडचे सेलिब्रिटी त्यांना घाबरत असल्याचीही चर्चा आहे. हे ही वाचा-क्रूझ पार्टीमध्ये मुनमुनने कसे आणले ड्रग्स; आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक VIDEO 2008 बॅचपासून आयआरएस अधिकारी आहेत समीर वानखेडे महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे 2008 बॅचच्या आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांच्या कर्तृत्वामुळे नंतर आंध्रप्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठविण्यात आलं होत. त्यांना नशा आणि ड्रग्ज प्रकरणातील प्रकरणात तज्ज्ञ मानलं जातं. समीर वानखेडे याच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात 17 हजार कोटी रुपयांची नशा आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी वानखेडे यांना डीआरआयकडून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Drugs, NCB

    पुढील बातम्या