S M L

समीर भुजबळ सव्वा दोन वर्षांनी तुरुंगाबाहेर

Sachin Salve | Updated On: Jun 7, 2018 11:52 PM IST

समीर भुजबळ सव्वा दोन वर्षांनी तुरुंगाबाहेर

 

मुंबई, 07 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ अखेर सव्वा दोन वर्षांनी कारागृहाबाहेर आले. आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

बुधवारी मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही आणि सुनावणीवेळी कोर्टात हजर राहावं लागेल या अटीवर कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालाय.

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली समीर भुजबळ अटकेत होते.

'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा लाभ समीर यांना मिळू शकत नाही, असं म्हणत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मंगळवारी समीर यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 11:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close