Home /News /mumbai /

EXCLUSIVE: खरंच राजकीय पक्ष काढणार का? संभाजीराजेंनी दिलं स्पष्टच उत्तर

EXCLUSIVE: खरंच राजकीय पक्ष काढणार का? संभाजीराजेंनी दिलं स्पष्टच उत्तर

संभाजीराजेंनी म्हटलं, मी सर्वसामान्य माणूस आहे. लोकांसाठी काम करत राहणे. आलेली संधी सुवर्णसंधी कशी करायची हे पहायला हवं.

  मुंबई, 7 जुलै : खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत (Sambhaji Raje Exclusive interview to News18 Lokmat) देत मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्व गोष्टींवर सडेतोड मुलखात देत प्रश्नांची उत्तरे दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संभाजीराजे हे प्रयत्नशील आहेत. संभाजीराजे नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर संभाजीराजे यांनी आज दिलखुलासपणे उत्तरे दिली. खरंच राजकीय पक्ष काढणार का? संभाजीराजे यांनी म्हटलं, मी आजपर्यंत माझ्या जीवनात एक पक्ष काढावा या हेतूने कधीच काम केले नाही. मी 2007 पासून सामाजिक जिवनात बाहेर पडलो आहे. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर निश्चितच एक चळवळ उभी राहिल्याचं दिसेल. अगदी माझ्यात सुद्दा चळवळ उभी राहिली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने ती जबाबदारी सुद्धा मी स्वीकारली पाहिजे. पण एक हिडन अजेंडा म्हणून मी काम करत नाही. येणारी जबाबदारी खांद्यावर येईल ती घ्यायची ही छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तींची असायलाच पाहिजे मग ती कुठलीही असेल. सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा सांस्कृतिक असेल. कसलीही आणि कुठलीही जबाबदारी आपल्यावर पडेल तर मागे पडून चालत नाही. नागरिकांची सेवा अहोरात्र करायचं हे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे.
  मुख्यमंत्री व्हायचं का? बीडमध्ये केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे यांनी म्हटलं, जी काही जबाबदारी आपल्यावर पडेल ती आपण घ्यायला हवी. बीडमध्ये असा काही त्यांनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर आत्ताचे मुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री सुद्धा देऊ शकत नाहीत. ते म्हणजे ओबीसीच्या संबंधित होते. तो विषय आणखी वाढू नये म्हणून त्याच्याशी कनेक्टेड माझं वाक्य होतं की मला ती जबाबदारी द्या आणि मग आपण पाहू प्रश्न सोडवता येते का. इच्छा असणे आणि इच्छा पूर्ण करण्यात यात खूप फरक आहे. मी सर्वसामान्य माणूस आहे. लोकांसाठी काम करत राहणे. ज्या घरात आपला जन्म झाला आहे. ती आलेली संधी सुवर्णसंधी कशी करायची, उद्या अनेक वर्षांनंतर कुणीतरी म्हटलं शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखं यांनी 5 टक्के काम केलं असं म्हटलं तरी भरपूर आहे. त्यामुळे वेट अँण्ड वॉच आपण पुढे काम करत जायचं.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati

  पुढील बातम्या