मुंबई, 24 जून: मुंबई पोलिसांच्या कार्याचं नेहमीच कौतुक केलं जातं. मुंबई पोलीस (Mumbai Police) सोशल मीडियातही खूप सक्रिय असतात. मुंबई पोलिसांनी आता असे एक काम केले आहे ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. होय, कारण अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची पोलिसांनी 24 तासांत सुटका (abducted girl rescued within 24 hours) केली आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी ही करावाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. 23 जून रोजी ही तक्रार दाखल झाली होती. दुपारच्या सुमारास दाखल झालेल्या या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आपली सूत्रे हालवली आणि तपास सुरू केला.
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात; फसवणुकीचा आरोप
या प्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर पीडित मुलीची 12 वर्षीय बहिणीने या प्रकरणी पोलिसांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार आपल्या शेजारी राहणाऱ्या नशिबूल हिच्यासोबत आपल्या बहिणीला जाताना पाहिल्याचं तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नशिबूल हिच्या पतीला चौकशीसाठी बोलावले.
नशिबूल हिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी शोहेब याच्यासोबत वारंवार बोलत असे. त्यानंतर पोलिसांनी शोहेब याचा फोन नंबर काढला आणि त्याच्या नातेवाईकांचाही शोध घेतला. तसेच तो कुठे असू शखतो याचा अंदाज बांधला. यानंतर पोलिसांना पीडित मुलगी ही टिटवाळा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलिसांनी धाड टाकत पीडित मुलीची सुटका केली. तसेच गुन्ह्यात आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.