मुंबई, 26 जून: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home minister Anil Deshmukh) यांच्या दोन्ही पीएना ईडीनं अटक केली आहे. सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला (Kundan Shinde and Sanjeev Palande ) अटक करण्यात आली. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीवरुन, सचिन वाझेनं (Sachin Waze)आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. 4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले. सचिन वाझेने हेच पैसे कुंदन शिंदेला दिले. आणि कुंदन शिंदेने हे पैसे अनिल देशमुख यांना दिले असा खुलासा सचिन वाझेनं त्याच्या जबाबात केला असल्याचं ED च्या सुत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या रिमांड सुनावणीला मुंबई सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. न्यायमूर्ती डॉ. यू. जे मोरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु आहे. वकील शेखर जगताप संजीव पालांडे यांची बाजू मांडत तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर मांडताहेत. ईडीच्या बाजून वकील सुनिल गोंसावलीस बाजू मांडत असून त्यांनी दोघांची 7 दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली आहे. ईडी वकिलांची माहिती मुंबई उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका दाखल दाखल केल्या असून या याचिकेवर दिलेल्या आदेशावर सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ईडीचे वकील सुनिल गोंसावलीस यांनी दिली आहे. PMLA ACT 50 नुसार अनिल देशमुख यांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. याच कायद्यांतर्गत बरोबर आणखी ही काही जणांचे जबाब इडीने नोंदवले आहेत. तसंच सीबीआयने दाखल केलेल्या FIR अंतर्गत ईडीने ECR रजिस्टर केला आहे. ED चा ECR हे सार्वजनिक कागदपत्रे नसतात. ECR दाखल केल्यानंतर आम्ही चौकशी करता आरोपींना समन्स केले होते. संजीव पालांडे हा अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहेत तर कुंदन पालांडे हा अनिल देशमुख यांचा असिस्टंट आहे. बार मालकांकडून पैसे काढायचे असा आरोप यांच्यावर आहे, अशी माहिती वकिलांनी दिली आहे. हेही वाचा- अनिल देशमुख प्रकरणावर संजय राऊत भडकले, म्हणाले… सचिन वाझेने डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये गुडलक म्हणून संजीव पालांडेला दिले होते. मुंबई पोलीस परिमंडळ 1 ते 6 आणि 7 ते 12 या 12 भागांतून मिळून सचिन वाझेनं 4 कोटी 80 लाख रुपये गोळा केले होते. 60 बार मालकांकडून पैसे वसूल केले, असा दावा वकिलांनी न्यायालयात केला आहे. रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवण्याकरता हे पैसे गोळा करण्यात आले होते. जया शेट्टी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे. सचिन वाझेने त्याच्या जबाबात यांचा उल्लेख केला आहे. ACP संजय पाटील आणि एक पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांना सचिन वाझेने सांगितले की अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे यांनी त्याला बार मालकांकडून पैसे गोळा करायला सांगितले आहे, असं ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना PMLA ACT अंतर्गत यांना अटक केली आहे. यांची अजून चौकशी करणे बाकी आहे. पैशांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत. या प्रकरणी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे या बाबत चौकशी करायची असल्याचं सुनिला गोंसावलीस यांनी न्यायालयात म्हटलं आहे. हेही वाचा- ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी देशमुखांच्या दोन्ही पीएना अटक केली. (Money Laundering Case) या दोघांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. बार मालक आणि सचिन वाझेच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. बार मालकांचे जबाब नोंदवले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील 10 ते 12 बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली. 10 ते 12 मालकांनी मिळून काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून काल दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, बार मालकांनी दिलेल्या या जबाबात अनिल देशमुख यांचे नाव घेतले की नाही, तसेच त्यांचा या प्रकरणात संबंध आहे की नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.