• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टाची परवानगी, NIA नं मागितलेली कस्टडी नाकारली

सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टाची परवानगी, NIA नं मागितलेली कस्टडी नाकारली

सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टानं परवानगी दिली आहे.

  • Share this:
मुंबई, 30 ऑगस्ट: अँटिलिया प्रकरण (Antilia Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) आणि सुनील माने (Sunil Mane) यांची पुन्हा चौकशी करावी लागेल आणि म्हणूनच एनआयएने (NIA Custody) त्यांची कोठडी मागितली होती. यावर आज पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी NIA नं मागितलेली कस्टडी कोर्टानं नाकारली आहे. तसंच कोर्टानं सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी दिली आहे. सचिन वाझेला शस्त्रक्रिया करण्यास परवानगी सचिन वाझे या़च्यावर ह्रदयविकाराची शस्त्र क्रिया करणे गरजेचे आहे. त्याच्या हृदयात 3 ब्लाँक आहेत. जे 90% हून अधिक आहेत. त्यामुळे वाझेला कोर्टानं सुराना रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. उपचारानंतर 15 दिवसात काय उपचार करण्यात आले त्याची कागदपत्र जमा करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिलेत. तसंच सचिन वाझेला चालताना त्रास होत असल्याने व्हिलचेअरच्या केलेल्या मागणीलाही कोर्टानं परवानगी दिली आहे. सचिन वाझेच्या वकिलांनी कोकीळाबेन, सुराना किंवा सेफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. दहीहंडीवरून मनसे आक्रमक, ठाण्यात अडवले तर दादरमध्ये हंडी उभारण्याचा इशारा म्हणून वाझेला न्यायाधीशांनी फटकारलं सचिन वाझेला सुनील मानेशी बोलत असताना न्यायाधीशांनी फटकारलं. या दोघांना न्यायाधीशांनी आरोपींच्या बसण्याच्या जागेवर पाठवलं होतं. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या जवळबसून बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोघांना फटकारत अंतर ठेवण्यास सांगितलं. NIA ची मागणी फेटाळली NIA ने कोर्टाकडे सचिन वाझेच्या 2 दिवसाची आणि सुनिल मानेच्या 4 दिवसांच्या कस्टडीची मागणी केली होती. या गुन्ह्यात 30 दिवस कस्टडी मिळते. त्यानुसार सचिन वाझेची 28 दिवस कस्टडी झालेली असून 2 दिवस कस्टडी बाकी आहे. तर सुनिल मानेची 14 दिवस कस्टडी झालेली आहे. त्यामुळे मानेची 4 दिवस कस्टडी मागण्यात आली आहे. मात्र दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर तपासा दरम्यान काही महत्वाचे पुरावे NIA च्या हाती लागलेले आहे. हे पुरावे एका संशयित आरोपीचे आहेत. त्या अनुशंगाने तपास करणे गरजेचे आहे. त्यानुसार दोघांची कस्टडी मिळणे गरजेची आहे. शिवसेना खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर EDच्या धाडी आरोपींकडे मोठ्या प्रमाणात रोक रक्कम मिळूनआली होती. पैशांचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यानुसार दोघांकडे चौकशी करायची असल्याचा युक्तीवाद NIA कडून करण्यात आला. मनसुखच्या हत्येमध्येही त्या संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे दोघांच्या कस्टडीची मागणी NIA कडून मागण्यात आली. मात्र NIA नं मागितलेली कस्टडी कोर्टाने नाकारली.
Published by:Pooja Vichare
First published: