मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दहीहंडीवरून मनसे आक्रमक, ठाण्यात अडवले तर दादरमध्ये हंडी उभारण्याचा इशारा

दहीहंडीवरून मनसे आक्रमक, ठाण्यात अडवले तर दादरमध्ये हंडी उभारण्याचा इशारा

ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता दादरमध्ये (Dadar) दहीहंडी उभी करणार असल्याचं ट्विटर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता दादरमध्ये (Dadar) दहीहंडी उभी करणार असल्याचं ट्विटर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता दादरमध्ये (Dadar) दहीहंडी उभी करणार असल्याचं ट्विटर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

पुढे वाचा ...

दादर, 30 ऑगस्ट : दहीहंडी (Dahi Handi) साजरी करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सरकारी आदेश (Government Order) झुगारून ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता दादरमध्ये (Dadar) दहीहंडी उभी करणार असल्याचं ट्विटर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे. या ट्विटची (Tweet) दखल घेत दादर पोलीस (Dadar Police) संदीप देशपांडे यांच्या शाखेवर दाखल झाले असून त्यांना नोटीस (Notice) देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

ठाण्यात दहिहंडी उत्सवावरुन मनसे आणि पोलीस आमने सामने आले आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे. मात्र मनसेनं हा उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश आंदोलनाला बसले. मात्र त्यानंतर काही वेळात मनसे पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मनसैनिक पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ठाण्यात भगवती मैदानावर मनसैनिक पुन्हा आले आणि ते दहिहंडी साजरी करणारच असं म्हणत पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

कोरोना प्रतिबंधक नियमाप्रमाणे 188 प्रमाणे कलम 149  च्या अनुसार मनसेच्या पदाधिकारी यांना नोटीस दिल्या नंतर देखील आदेशाचा भंग आणि पालन न केल्या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. विना परवाना उभारलेले स्टेजदेखील हटवण्यात येत आहे. यामुळे दादरमधील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ठाण्याच्या घटनेचे दादरमध्ये पडसाद

ठाण्यात जर दहीहंडी उत्सवाला पोलीस आडकाठी करणार असतील, तर दादरमध्ये आपण दहीहंडी करू, अशा आशयाचं ट्विटर मनसेचे दादरमधील नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. शिवसेनेसह राजकीय पक्षांच्या आंदोलनावेळी सरकारला कोरोनाची काळजी नसते, मात्र केवळ हिंदूंच्या सणावेळीच कोरोनाचे नियम आडवे का येतात, असा सवाल मनसेने केला आहे.

हे वाचा - ठाण्यात दहिहंडी उत्सवावरुन मनसे- पोलीस आमने सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना विरुद्ध मनसे

राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग होऊन शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर मनसेचे शिवसेनेची जुनी स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठीच्या मुद्द्यासोबत आता मनसेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले असून तोंडावर आलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: MNS, Mumbai, Thane (City/Town/Village)