मुंबई, 11 मे: मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याला स्फोटक प्रकरण आणि मनसूख हिरेण हत्या प्रकरणात अटक झाल्यावर आता त्याच्यावर बडतर्फाची कारवाई (Sachin Waze dismissed from service) करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police Commissioner) या संबंधित आदेश काढले आहेत.
मुंबईत एका एसयूव्हीमध्ये स्फोटक आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होता. ज्या गाडीत ही स्फोटके आढळून आली होती त्याच गाडीच्या मालकाचा काही दिवसांत संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी विरोधकांनी अधिवेशनातही जोरदार गदारोळ घातला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.
चालत्या Lamborghini Urus ने घेतला पेट; 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेली आलिशान कार काही क्षणांतच खाक
विरोधकांच्या गदारोळानंतर मुंबईत स्फोटक आढळून आल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला होता. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत होते. मात्र, नंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्या ताब्यात घेतला.
एनआयएने केलेल्या तपासात असे समोर आले की, स्फोटक प्रकरण आणि मनसूख हिरेण यांचा मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणात सचिन वाझे याचाच सहभाग आहे. त्यानंतर एनआयएने सचिन वाझे याला अटक केली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी सचिन वाझे याच्यावर कारवाई करत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.