जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत 1 मार्चपासून महागणार Auto, taxi चा प्रवास, वाचा किती होणार वाढ

मुंबईत 1 मार्चपासून महागणार Auto, taxi चा प्रवास, वाचा किती होणार वाढ

मुंबईत 1 मार्चपासून महागणार Auto, taxi चा प्रवास, वाचा किती होणार वाढ

मुंबईत रात्री टॅक्सी आणि ऑटोने प्रवास करणं आता महाग होणार आहे. परिवहन मंत्रालयाने नवीन दरपत्रकं दिली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 28 फेब्रुवारी : राज्य परिवहन मंत्रालयाने (Transport Ministry) शनिवारी नवीन दरपत्रक (New Tarrif Card) जारी केले आहे. यानंतर आता मुंबईत टॅक्सी आणि ऑटोचे रात्रीच्या प्रवासासाठी लागणारं भाडं वाढणार आहे. शहरात रात्री प्रवास करण्यासाठी तुम्हाला ऑटोमध्ये किमान (Minimum Night Fare) 27 रुपये आणि टॅक्सीमध्ये 32 रुपये खर्च करावे लागतील. या वाढीव किंमती 1 मार्च ते 31 मे दरम्यान लागू राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यावेळी चालकाला इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करावे लागतील. मुंबईत रात्री टॅक्सी आणि ऑटोने प्रवास करणं आता महाग होणार आहे. परिवहन मंत्रालयाने नवीन दरपत्रकं दिली आहेत. 1 जूनपासून भाडं केवळ इलेक्ट्रॉनिक मीटरद्वारे आकारलं जाईल. भाड्याच्या रकमेत झालेल्या या वाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी शहरात प्रवास करण्याची सर्वात महाग साधनं झाले आहेत. 1 मार्चपासून ऑटोचं किमान भाडं 18 वरुन वरुन वाढवून 21 रुपये होणार आहे. त्याचवेळी टॅक्सीचं भाडं 22 रुपयांऐवजी 25 रुपये होणार आहे. कूल कॅबचं भाडं 28 रुपयांवरुन 33 रुपयांवर पोहोचणार आहे. रात्रीसाठीचं हे दरपत्रक मध्यरात्रीपासून सकाळी 5 वाजेपर्यंत लागू असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास 4.6 लाख ऑटो आणि 60 हजार टॅक्सी रीकॅलिब्रेशनच्या प्रक्रियेतून जातील. अशात मीटर अपग्रेड करण्यासाठी ड्रायव्हरला 700 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 0 नं संपणाऱ्या रंजिस्ट्रेशन नंबरच्या वाहनांचं 1 मार्च ते 7 मार्च या काळात रीकॅलिब्रेशन केलं जाईल. यानंतर वाहनाची रस्त्यावर काही अंतरापर्यंत टेस्ट घेतली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात