पुणे, 27 एप्रिल: काल पुण्यातील औंधगाव याठिकाणी तीन चोरट्यांनी वयोवृद्ध दाम्पत्यांना 16 लाखांना लुटलं (Robbery in pune) होतं. ही घटना ताजी असताना, आज पुण्यात जबरी चोरीची दुसरी घटना समोर आली आहे. येथील एका कारागिरानं सोन्याचे दागिने पॉलिश करणाऱ्या व्यावसायिकाला (jewellery polisher) तब्बल 35 लाख 80 हजारांचा गंडा (looted by artisans) घातला आहे. त्याने दागिने पॉलिश करण्याच्या बाहाण्याने सर्व दागिने घेऊन धूम ठोकली आहे. संबंधित घटना पुण्यातील बुधवार पेठेत घडली असून याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. संबंधित 36 वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव मनोत इंद्रजीत मन्ना असून ते पुण्यातील कसबा पेठेत राहतात. फिर्यादी मन्ना यांचा सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचा व्यावसाय आहे. तर 31 वर्षीय आरोपीचं नाव मैदुल शेख असून तो फिर्यादी मन्ना यांच्या दुकानात कारागिर म्हणून काम करतो. तो मुळचा पश्चिम बंगालमधील हुगळी या ठिकाणचा रहिवासी आहे. दैनिक पुढारी नं दिलेल्या वृत्तानुसार, आज पुण्यातील एका सराफाने मन्ना यांच्याकडे काही सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. यावेळी फिर्यादी मन्ना यांनी आरोपी कारागिर मैदुल शेखवर विश्वास ठेवून सर्व दागिने त्याच्याकडे पॉलिश करण्यासाठी दिले. एवढ्या मोठ्या रकमेचे दागिने हाती पडल्यानंतर आरोपीचं मन बदललं आणि त्याने दागिने लंपास करून पळ काढला आहे. (वाचा- पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यात 16 लाखांची चोरी; चाकूच्या धाकाने लुटलं **)** दागिने देवून बराच वेळ झाल्यानंतरही आरोपी शेख याने दागिने परत न आणल्याने फिर्यादी मन्ना यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. यानंतर मन्ना यांनी आरोपीला शोधायला सुरुवात केली. पण बराच वेळ तो सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.