RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मुंबई आणि उपनगराला बुधवारी सकाळपासून पावसानं झोडपून काढलं आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 02:47 PM IST

RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, 9 ऑगस्ट : मुंबई आणि उपनगराला बुधवारी सकाळपासून पावसानं झोडपून काढलं आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. मुंबई वेधशाळेने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असं सांगितलं आहे. मुंबईत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. बुधवारी मुंबईच्या उपनगरी गाड्यांची वाहतूक सकाळपासूनच विस्कळीत झाली. त्यात दुपारी साडेअकरापासून मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रस्त्यांवरही प्रचंड पाणी साठल्याने वाहतूक मंदावली आहे. ऑफिसमध्ये गेलेल्या चाकरमान्यांचं घरी पोहोचणं त्यामुळे अवघड होऊ शकतं.

Loading...

मुंबईत आणि ठाण्यात पुढच्या 24 तासांत अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टी होत आहे.

हे वाचा - मुंबईकरांनो सावधान! पुढील दोन दिवस बरसणार मुसळधार पाऊस

 पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने weather updates कडे लक्ष ठेवावं, असंही म्हटलं आहे. सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. बुधवारी सकाळी पावसाने कहर केला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाच्या हजेरीने उत्साहावर पाणी फिरलं आहे.

सप्टेंबरचं रेकॉर्ड मोडलं

मुंबईत सप्टेंबरमध्ये पडणारा सरासरी पाऊस 341मिमी इतका असतो. या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच पावसाने हा विक्रम मोडला आहे. चार दिवसात तब्बल 403मिमी पाऊस झाला आहे.

हा पाऊस आणखी दोन दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. वेधशाळेने बुधवारी रेड अलर्ट जारी केला आहे. गुरुवारीसुद्धा बऱ्याच भागात अतिवृष्टी होऊ शकते. पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोलीत गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर)पर्लकोटा नदीसह बांडीया नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली बुडाला आहे तसंच कुमरगुडा नाल्याचा पूल देखील पाण्याखाली गेल्याने या भागातल्या गावांसह तालुक्याचा संपर्क तुटला होता. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे.

VIDEO: मुंबईकरांनो सावधान, येत्या 48 तासांत होणार मुसळधार पाऊस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...