जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...

BMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...

BMCच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; महापौरांनी म्हटलं...

राजावाडी रुग्णालयात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जून: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या सर्व गोष्टीची खातरजमा करत होतो तेव्हा लक्षात आलं की, हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पण तळाला असल्याने आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्याने निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्याने लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली. Shocking! मुंबईत ICUमधील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; नातेवाईकांच्या आरोपाने एकच खळबळ

जाहिरात

महापौरांनी पुढे म्हटलं, आयसीयू वॉर्ड असल्याने तळ मजल्यावरच असायला हवा कारण रुग्णाला नेण्यासाठी बरं पडतं. इतकी खबरदारी घेतली असतानाही उंदीर आतमध्ये जातात. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी काय म्हटलं? याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदरचा आयसीयू रूम हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा वावर आहे आणि प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात