जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कांदिवलीत पोलिसांना धक्का देत बलात्काराचा आरोपी पसार, आरोपीच्या उजव्या हातात हातकडी

कांदिवलीत पोलिसांना धक्का देत बलात्काराचा आरोपी पसार, आरोपीच्या उजव्या हातात हातकडी

कांदिवलीत पोलिसांना धक्का देत बलात्काराचा आरोपी पसार, आरोपीच्या उजव्या हातात हातकडी

Rape Accused Escaped: पोलिसांच्या गाडीतून उडी मारून आरोपी पसार झाला आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जुलै: मुंबईत बलात्कार प्रकरणातील आरोपीनं पोलिसांना चकवा देत फरार (Rape Accused Escaped) झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या गाडीतून उडी मारून आरोपी पसार झाला आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. अँटीजन चाचणी **(Rapid Antigen Test)**करुन परत येत असताना बलात्कारातील आरोपी पसार झाला. मुंबईच्या कांदिवलीतील सिग्नलजवळ (Kandivali signal in Mumbai) हा प्रकार घडला आहे. अविनाश यादव असं या आरोपीचं नाव आहे. सध्या चारकोप पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. पोलिसांची गाडी कांदिवली येथील सिग्नलजवळ थांबली. गाडी थांबताच आरोपीनं पोलिसांना धक्का देत हातकडीसह फरार झाला.

जाहिरात

21 वर्षीय अविनाश यादव असं फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे. 26 जून 2021 रोजी चारकोप पोलिसांनी त्याला अटक केली होती. आरोपीचं 17 वर्षांच्या एका मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं. याच दरम्यान या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार अविनाश यादववर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. हेही वाचा-  सिडकोच्या ‘त्या’ लाभार्थ्यांसाठी Good News, एकनाथ शिंदे यांची माहिती अविनाशला पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली होती. काल सकाळी त्याला अँटीजन चाचणी करण्याासाठी नेण्यात आलं. मात्र तिथून परत येत असताना कांदिवली सिग्नलजवळ पोलिसांची गाडी थांबली होती. गाडी थांबताच त्यानं त्या संधीचा फायदा घेतला आणि पोलिसांना धक्का देत तो पसार झाला. आरोपी हातकडीसह पळाला आहे. यानंतर चारकोप पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. अविनाश यादवचे वर्णन नाव- अविनाश हरिश्चंद्र यादव वय- 21 वर्षे पत्ता- राठी लक्ष्मीनगर, चारकोप, मुंबई वर्ण- काळा टी शर्ट, रंग निमगोरा, उंची 5 फूट 4 इंच कुरळे केस मागे वळलेले, गालावर उजव्या बाजूस तीळ, उजव्या हातात बेडी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात