मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Raksha Bandhan 2021 Messages: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Raksha Bandhan 2021 Messages: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Raksha Bandhan 2021 Messages: रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Raksha Bandhan 2021 Messages: रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Raksha Bandhan 2021 Messages: रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  मुंबई, 21 ऑगस्ट: Raksha Bandhan 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व असते. त्यापैकीच एक म्हणजे रक्षाबंधन. सर्वत्र रक्षाबंधन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. यंदा 22 ऑगस्ट 2021 रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी केवळ राखीच बांधत नाहीत तर बहिण भाऊ एकमेकांना शुभेच्छा आणि खास गिफ्ट सुद्धा देतात. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस Raksha Bandhan Messages, Raksha Bandhan HD Images सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस. Narali Purnima 2021 Messages: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Raksha Bandhan 2021 Messages)

  कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,

  म्हणूनच भाऊ बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे

  सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

  नात्यांचे गोड बंधन

  रेशमाच्या धाग्यांनी अधिक समृद्ध

  करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन

  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा !!

  ऋणानुबंध राखीच्या धाग्याचा

  हळव्या बहिण भावाच्या नात्याचा...

  सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

  दिवस भाऊ बहिणीच्या अभिनव नात्याचा...

  ना अट रक्ताच्या नात्याची,

  ना जाती-धर्माची,

  भावना फक्त एकमेकांच्या रक्षणाची, सुरक्षेची

  आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

  बंध विश्वासाचे

  बंध सहकार्याचे

  बंध विश्वबंधूत्वाचे

  नाते शब्दांच्या पलिकडचे

  बहिण आणि भावाचे...

  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  रक्षाबंधनाचा सण हा आला

  ताई दादाच्या आठवणी जागा झाल्या,

  एका राखीत सर्वकाही सामावले

  बहिण भावाचे प्रेम जगावेगळे...

  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

  घेऊन आला हा श्रावण

  लाख लाख शुभेच्छा तुम्हाला

  आज आहे बहिण-भावाचा पवित्र सण

  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Raksha bandhan

  पुढील बातम्या