• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Narali Purnima 2021 Messages: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Narali Purnima 2021 Messages: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status

Narali Purnima 2021 Messages: नारळी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • Share this:
    मुंबई, 21 ऑगस्ट: Narali Purnima 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व असते. श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव येतात. त्यापैकीच एक म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते. यंदा 22 ऑगस्ट 2021 रोजी नारळी पौर्णिमा आहे. कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला फारच आगळंवेगळं महत्व असतं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधवच नाही तर इतर नागहीकही एकमेकांना शुभेच्छा देतात. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस Narali Purnima Messages, Narali Purnima HD Images सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस. Raksha Bandhan 2021 Messages: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp Status नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Narali Purnima 2021 Messages) (Photo Courtesy: Instagram_hareshdhanu25)
    (Photo Courtesy: Instagram_hareshdhanu25)

    दर्या सागर हाय आमुचा राजा...

    त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा...

    नारली पुनवेला नारळ सोन्याचा...

    सगळे मिळूनशी मान देताव दर्याला...

    सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    (Photo Courtesy: Facebook)
    (Photo Courtesy: Facebook)

    सण नारली पुनवेचा,

    दर्या सारंगा नमन तुजला !

    सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

    (Photo Courtesy: Facebook)
    (Photo Courtesy: Facebook)

    सण आज आला

    नारळी पौर्णिमेचा

    सागरपुत्रांच्या आनंदाचा

    दर्या राजा असे देव त्यांचा

    रक्षणकर्ता तो सकलांचा

    नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

    (Photo Courtesy: Facebook)
    (Photo Courtesy: Facebook)

    कोळी बांधवांचा सण,

    उधाण आनंदाला,

    कार्यारंभ करती,

    अर्पूण नारळ सागराला...

    नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    (Photo Courtesy: Instagram_rovingframe)
    (Photo Courtesy: Instagram_rovingframe)

    सण आयलाय गो आयलाय गो

    नारळी पुनवेचा !

    मनी आनंद मावना

    कोळ्यांचे दुनयेचा !

    अरे बेगीन बेगीन चला किनारी

    जाऊ देवाच्या पुंजेला...

    हात जोडूनी नारळ सोन्याचा सोडूया दर्याला !

    नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

    (Photo Courtesy: Instagram_savenavimumbaienvironment)
    (Photo Courtesy: Instagram_savenavimumbaienvironment)

    कोळीवारा सारा सजलाय गो...

    कोळी यो नाखवा आयलाय गो...

    नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    (Photo Courtesy: Instagram_rovingframe)
    (Photo Courtesy: Instagram_rovingframe)

    सण जिव्हाळ्याचा दिवस आज

    नारळी पौर्णिमेचा

    समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

    Published by:Sunil Desale
    First published: