मुंबई, २० मे -राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी आता सूत्र आपल्या हातात घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दुसऱ्या दिवशी अपक्ष आमदारांना भेटीसाठी बोलावले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर अपक्ष आमदारांसोबत बैठक होत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार जर उभा केला तर प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. मग अपक्ष आमदारांचे मत मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच होऊ शकते. हा घोडाबाजार टाळण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदरांशी चर्चा करण्याासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीला
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, रामटेक -आशिष जैस्वाल,गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर, कोल्हापूरमधून राजेंद्र यड्रावकर, धुळ्यातून मंजुषा गावित, मीरा भाईंदरमधून गीता जैन आणि मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील हे बैठकीला उपस्थितीत आहे.
तर दुसरीकडे, संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत ट्रायडंट हॉटेल समोर जमले आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना सर्व पक्षांनी मदत करावी तसे त्यांना पक्षात सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नये अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे. संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करून आपली राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे संभाजेराजेंना कोणत्याही पक्षाची उमेदवारी न देता त्यांना पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी संभाजीराजे समर्थक करत आहे.
तर,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी गुरुवारी बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे वर्षा बंगल्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेच्या या प्रत्सावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी असा प्रस्ताव संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करून कळवतो असे सांगितलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasabha, Rajaya sabha