जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Rajya Sabha Election : भाजप आमदार पोहोचले मुंबईत, बैठकीला फडणवीस राहणार गैरहजर!

Rajya Sabha Election : भाजप आमदार पोहोचले मुंबईत, बैठकीला फडणवीस राहणार गैरहजर!

 

या बैठकीत भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीत भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीत भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 08 जून : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये हलवलं आहे. तर आता भाजपचे (bjp mla) आमदारही मुंबईमध्ये दाखल होत आहे. आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस या बैठकीला गैर हजर राहणार आहे. राज्यसभा निवडणुकीची आता दोन दिवस उरले आहे. महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर भाजपचे आमदार आता मुंबईत दाखल होत आहे. भाजप आमदारांची ताज प्रेसिडेंट इथं बैठक होणार आहे.  या बैठकीला मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार नाहीत. कोरोना चाचणीचा अहवाल अजूनही आलेला नसल्याने ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. या बैठकीत भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले, महेश लांडगे,गणेश नाईक पोहोचले आहे. (हेही वाचा -  वैतागलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; बॉयफ्रेंडच्या अंगावर 3 वेळा घातली कार, दिला भयानक मृत्यू ) दरम्यान, कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळं तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. मनसेच्या एकमेव आमदाराचं मत कुणाच्या पारड्यात? शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून लक्षान पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे नेते आशिष शेलार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलं, पक्षाच्या वतीने येत्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचं जे एक मत आहे ते भाजप उमेदवाराला मिळावं अशी विनंती मी राज ठाकरेंना केली. मी धन्यवाद व्यक्त करतो की, राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि मला सांगितलं. ते मत भाजपला मिळेल. त्यामुळे आमचा विजय अधिक सुकर आणि सोपा होईल. महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी 1) शिवसेना - 55 2) राष्ट्रवादी काँग्रेस - 53 3) काँग्रेस - 44 4) सपा - 2 5) प्रहार - 2 6) स्वाभिमानी शेतकरी - 1 मविआ समर्थक इतर आमदार अपक्ष आमदार संख्या - 9 1) शंकरराव गडाख, अहमद नगर 2) राजेंद्र पाटील-येड्रावकर, कोल्हापूर 3) मंजुषा गावित, धुळे 4) गिता जैन, मीरा-भाईंदर 5) आशिष जयस्वाल, रामटेक 6) किशोर जोरगेवार, चंद्रपूर 7) चंद्रकांत पाटील, जळगाव 8) विनोद अगरवाल, गोंदिया 9) संजय शिंदे, करमाळा एकूण 166 आमदार (नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्यास परवानगी न दिल्यास 164) 164 आकडा धरल्यास 3 उमेदवारांना प्रत्येकी 42 मते दिल्यानंतरही महाविकास आघाडीकडे 38 मते शिल्लक राहतात. म्हणजे विजयासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या तटस्थ असणाऱ्या 7 आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. तटस्थ लहान पक्ष आणि आमदार 1) बहुजन विकास आघाडी - 3 2) शेकाप - 1 3) एमआयएम - 2 4) माकप - 1 तटस्थ आमदार संख्या एकूण - 7

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात