Home /News /mumbai /

EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या उमेदवाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे.

    मुंबई, 25 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) सहाव्या जागेच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. कारण खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी आपल्याला राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पाठींबा मिळावा, अशी विनंती केली आहे. पण शिवसेनेकडून (Shiv Sena) त्यांना काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. या अटींमुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले आहेत. तर संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि संजय पवार उद्या दुपारी एक वाजता विधान भवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी आगामी काळात कुठपर्यंत जातील याचा अंदाज बांधनं आता कठीण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी विधान भवनात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे इतर नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची घोषणा झालेली असताना दुसरीकडे वेगळ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळावा यासाठीदेखील शिवसेनेवर दबाव असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेकडून संजय पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तरीही संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. (पोस्टमास्तरचा प्रताप, 24 कुटुंबांच्या FD ने आयपीएल बेटिंग, एक कोटींना चुना) संजय राऊत शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले तेव्हा त्यांनी आपण शरद पवार यांची सदिच्छा भेटीसाठी आल्याची माहिती दिली. पण या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या राज्यसभेसाठीच्या दूसऱ्या उमेदवरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं मतही महत्त्वाचं आहे. त्यासाठीच संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी? राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आज संध्याकाळी सात वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांची उमेवारी निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. 'आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच घेणार', संभाजीराजेंचा व्हायरल फोटो दुसरीकडे संभाजीराजे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत संभाजीराजे यांचा फोटो आहे. तसेच या फोटोवर "आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार! इतिहासाची पुनरावृत्ती होणार. महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती. लक्ष-2024", अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या