Home /News /mumbai /

Rajya Sabha Election: ईडी कारवाईची टांगती तलवार, बविआ भाजपा मतदान करणार? मविआची डोकेदुखी वाढणार

Rajya Sabha Election: ईडी कारवाईची टांगती तलवार, बविआ भाजपा मतदान करणार? मविआची डोकेदुखी वाढणार

Rajya Sabha Election: ईडी कारवाईची टांगती तलवार, बविआ भाजपा मतदान करणार? मविआची डोकेदुखी वाढणार

Rajya Sabha Election: ईडी कारवाईची टांगती तलवार, बविआ भाजपा मतदान करणार? मविआची डोकेदुखी वाढणार

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इतर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मते निर्णायक ठरणार आहेत.

    तुषार रुपनवर, प्रतिनिधी मुंबई, 4 जून : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार हे आता अटळ आहे. सहावा उमेदवार जिंकवण्यासाठी मविआ (Mahavikas Aghadi) आणि भाजपला (BJP) छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुजन विकास आघाडी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची देखील टांगती तलवार असल्याने बविआ भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यातमध्ये चांगलेच सक्रिय झाल्याने बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे. वसई-विरार महानगर पालिका निवडणूकीसाठी देखील शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. याचमुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतांची गोळाबेरीज कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात मात्र शिवसेनेसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अतिरिक्त मतांची संख्या जास्त असूनही राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे. पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळं तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देवूनही 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. वाचा : राज्यसभेची निवडणूक अटळ; भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही घेतला मोठा निर्णय भाजपच्या पाठिशी कोण? भाजपचे 106 आमदार भाजपला पाठिंबा देणारे छोटे पक्ष व अपक्ष आमदार - 7 1) रासपचे राहूल कूल 2) जनसुराज्यचे विनय कोरे 3) रवी राणा 4) प्रकाश आवाडे 5) राजेंद्र राऊत 6) रत्नाकर गुट्टे 7) महेश बालदी,उरण एकूण - 113 आमदार भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असल्यानं येणार नाहीत. त्यामुळं भाजपची मतं 112 होतील. दोन उमेदवारांना 84 मते दिल्यानंतर 28 मते शिल्लक राहतात. धनंजय महाडिकांना विजयासाठी पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज पडणार आहे. भाजप धनंजय महाडिक यांना जिंकून आणण्यासाठी मोठा घोडेबाजार करणार हे आता उघड झालंय. तसे संकेतही भाजपच्या नेत्यांनी दिलेत. महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी 1) शिवसेना - 55 2) राष्ट्रवादी काँग्रेस - 53 3) काँग्रेस - 44 4) सपा - 2 5) प्रहार - 2 6) स्वाभिमानी शेतकरी - 1 मविआ समर्थक इतर आमदार अपक्ष आमदार संख्या - 9 1) शंकरराव गडाख, अहमद नगर 2) राजेंद्र पाटील-येड्रावकर, कोल्हापूर 3) मंजुषा गावित, धुळे 4) गिता जैन, मीरा-भाईंदर 5) आशिष जयस्वाल, रामटेक 6) किशोर जोरगेवार, चंद्रपूर 7) चंद्रकांत पाटील, जळगाव 8) विनोद अगरवाल, गोंदिया 9) संजय शिंदे, करमाळा एकूण 166 आमदार (नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्यास परवानगी न दिल्यास 164) 164 आकडा धरल्यास 3 उमेदवारांना प्रत्येकी 42 मते दिल्यानंतरही महाविकास आघाडीकडे 38 मते शिल्लक राहतात. म्हणजे विजयासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या तटस्थ असणाऱ्या 8 आमदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. तटस्थ लहान पक्ष आणि आमदार 1) बहुजन विकास आघाडी - 3 2) शेकाप - 1 3) एमआयएम - 2 4) माकप - 1 5) मनसे - 1 तटस्थ आमदार संख्या एकूण - 8
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Astrology and horoscope, BJP, Maharashtra News, Rajyasabha

    पुढील बातम्या