• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला आणखी एक झटका! शिवसेनेनंतर भाजपच्या गळाला मोठा नेता

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला आणखी एक झटका! शिवसेनेनंतर भाजपच्या गळाला मोठा नेता

मनसेचे (MNS) डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या मनसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

  • Share this:
डोंबिवली, 02 फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) पडत चाललेलं खिंडार आणखी मोठं होऊ लागलं आहे. शिवसेनेनंतर आज भाजपनेनही मनसेला (MNS) मोठा दणका दिला आहे. डोंबिवलीतील मनसेचे माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे (Mandar Halbe in BJP) थोड्या वेळेत भाजपात प्रवेश करणार आहेत. दादर पक्ष कार्यालयत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मनसेसाठी हा एक मोठा धक्का मानण्यात येत आहे. याआधी सोमवारी मनसेचे (MNS) डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या मनसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राजेश कदम आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांनी पक्षाची फसवणूक करत पाठीत खंजीर खुपसल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी राजेश कदम यांच्या जाण्यामुळे चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेल्याची खंत असल्याचं सांगितलं, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने कुणा एकासाठी पक्ष थांबत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
First published: