Home /News /mumbai /

मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक; ॲमेझॉन-फ्लिपकार्टला दिला मनसे स्टाइल इशारा

मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक; ॲमेझॉन-फ्लिपकार्टला दिला मनसे स्टाइल इशारा

...अन्यथा दिवाळीचा सण मनसे स्टाइल साजरा करण्यात येईल.

    मुंबई, 15 ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत जर  त्यांनी त्यांच्या अॅप मध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेले दिला आहे.  ज्याप्रमाणे या कंपन्यांनी  दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईल साजरा करेल. असा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने काही कोळी महिलांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंकडे आपल्या समस्या व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर मासेविक्री करणाऱ्यांचा मनसे स्टाइट समाचार घेतला होता. अॅमेझॉन व फ्लिपकार्ट यांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दाक्षिणात्या भागांमध्ये तेथील भाषांनुसार अॅप सुरू केलं जात असेल तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amazon, Raj thacarey

    पुढील बातम्या