मुंबई, 16 ऑगस्ट : काही महिन्यांपूर्वी कोरोना सेंटरमध्ये (Covid centre) आग झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अशाच आग लागलेल्या एका कोविड सेंटरमध्ये (Mumbai covid centre) आता चक्क अजगर (Python in covid centre) सापडला आहे. कोविड सेंटरमध्ये चक्क भलामोठा अजगरच घुसला (Mumbai dahisar jumbo covid centre). त्यामुळे एकच खळबळ उडाली.
मुंबईतील दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये अजगर सापडला. त्यामुळे सर्वांनाच घाम फुटला. यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आलं. सर्पमित्रांनी अथक प्रयत्नांनंतर त्या अजगराला पकडलं. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याला सोडण्यात आलं आहे, अशी माहिती सर्पमित्र सूरज यादवने दिली आहे.
खळबळजनक! मुंबईतील दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये सापडला अजगर pic.twitter.com/qeTbNtF82w
— News18Lokmat (@News18lokmat) August 16, 2021
दहिसर पूर्व चेकनाक्याजवळ हे जम्बो कोविड सेंटर आहे. इथं कोरोना रुग्णांना उपचार दिले जातात. पण सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता इथं कोरोना लसीकरण केलं जात आहे. नागरिकांना कोरोना लस दिली जाते आहे.
हे वाचा - ...तर पुन्हा Lockdown; निर्बंध हटवल्याच्या पहिल्याच दिवशी CM ठाकरेंनी दिला इशारा
सुदैवाने वेळीच अजगर दिसला आणि फार लोक नव्हते, तसंच सर्पमित्रही लगेच दाखल झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid centre, Mumbai, Python, Snake video