मोठी बातमी, प्रताप सरनाईक यांचा पाय आणखी खोलात, धक्कादायक माहितीसमोर

मोठी बातमी, प्रताप सरनाईक यांचा पाय आणखी खोलात, धक्कादायक माहितीसमोर

ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कोठडी अहवालात थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा ईडी कोठडी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

  • Share this:

ठाणे, 27 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांना चांगलेच भोवणार असं दिसतं आहे. कारण, अंमलबजावणी संचनालयानं (ED) ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांनी ईडी कोठडी अहवाल केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे.

MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले आहे.

ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कोठडी अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा ईडी कोठडी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

प्रताप सरनाईक यांची निकटवर्तीय आणि मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांना ईडीनं दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले.  सरनाईक यांचे जुने निवासस्थान आणि समता नगरमधील मुख्य जनसंपर्क कार्यालय ज्या इमारतीत आहे. त्याच इमारतीत छाबियास विहंग सोसायटीत अमित चंडोळे राहतात. अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. प्रताप सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. विहंग ग्रूप ऑफ कंपनीला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीच्या डायरेक्टरपदावर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ॲाफ कंपनी यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे अमित चंडोळे आहे, असं सांगितलं जात आहे.

काय आरोप करण्यात आले?

1) MMRDA सुरक्षा रक्षक कंत्राटा मधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा हा 50 टक्के हिस्सा प्रताप सरनाईकांचा आहे.  असं टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते

2) मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते ज्यातकरता महिला 32 ते 33 लाख रुपये MMRDA देणार होती हे कंत्राट 50-50 टक्के प्रॉफिट शेअरनुसार टॉप्स ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलं होतं. हा प्रताप सरनाईकांचा 50 टक्के शेअर टॉप्स ग्रुपकडून प्रताप सरनाईक यांच्या करता अमित चंडोळे रोख रक्कमेत स्विकारायचा.

3) अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना 6 लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून 6 लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली.

4) उद्योगपती राहुल नंदा यांची आणि अमित चंडोळेची भेट प्रताप सरनाईक यांनी घडवून आणली होती.

5) MMRDA आणि टॉप्स ग्रुपमध्ये जे व्यवहार व्हायचे त्या व्यवहारातील 50 टक्के रक्कम ही राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलेल्या करारानुसार, अटी शर्ती पलिकडे जाऊन दिली जायची. ती ही रक्कम रोख स्वरुपात किंवा इंटरनेट बॅंकिंग स्वरुपात दिली जायची.

6) MMRDA चे सुरक्षा रक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी 50 टक्के नफा या टेंडरमधून प्रताप सरनाईकांना दिला जाईल असे सगळे व्यवहार तोंडी स्वरुपात एकमेकांशी झाली होते.

Published by: sachin Salve
First published: November 27, 2020, 10:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading