मुंबई, 12 जानेवारी : राज्यात एकीकडे कोरोनाने डोकं वर काढले आहे. तर दुसरीकडे प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2022) पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईसह इतर शहरात ड्रोनने हल्ल्याची (drone attack on Maharashtra) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रजासत्ताक दिनाला आता दोन आठवडे उरले असून राज्यभरात ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती आहे, या बद्दल केंद्रीय तपास यंत्रणेनं सतर्कतेचा इशारा दिला आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचं संभाषण झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणेनं दिली आहे. डार्क नेटचा वापर करून मुंबई आणि महाराष्ट्रातील काही संवेदनशील ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचे संभाषण डार्क नेटच्या ( Darknet) द्वारे झाले असल्याची माहिती यंत्रणेनं दिली आहे. ( वेस्ट इंडिजच्या खेळाडूने मारला सिक्स, आपल्याच सहकाऱ्याच्या Range Rover ला डेंट ) याबद्दल राज्यातील सायबर विभागाने एक अहवाल दिला आहे. दहशतवादी संघटना ड्रोन हल्ले, रासयानिक हल्ले आणि सायबर हल्ला करू शकतात. यासाठी डार्क नेटवर चर्चा करत होते. सरफेस इंटनेटच्या तुलनेच डार्क नेट 99 टक्के आहे. टोर ब्राऊझरचा यामध्ये वापर होत असतो त्यामुळे याचे लोकेशन शोधता येत नाही, याचा वापर करून दहशतवादी हल्ल्याचा कट शिजवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ड्रोनच्या मदतीने २० ते ३० किमी अंतरावर स्फोट घडवू शकतात. त्यामुळे ड्रोन हल्ला हाणून पाडण्यासाठी यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.