पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांना भेटताच हातात दिलं हे पत्र, नेमकं काय लिहिलं? संपूर्ण वाचा

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांना भेटताच हातात दिलं हे पत्र, नेमकं काय लिहिलं? संपूर्ण वाचा

Pooja Chavan Parent's Letter : या पत्रात पूजाच्या आई-वडिलांनी घेतलेल्या भूमिकेची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : राज्यभर पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर येत सरकारची भूमिका आक्रमक शब्दांमध्ये जाहीर केली.

या प्रकरणी विरोधी पक्ष गलिच्छ राजकारण करत असून पूजा चव्हाण हिचे आई-वडील आपल्याला भेटले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीत त्यांनी माझ्याकडे एक पत्र दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या पत्रात पूजाच्या आई-वडिलांनी घेतलेल्या भूमिकेची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

काय आहे पूजाच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या पत्रात?

"आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला. कुठल्याही माता पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूचा दु:खापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसूलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत.

आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई करतील याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनामाची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतु याआड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपांनी तिचा रोज बळी जात आहे. याचे राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका.

तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कार्रवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावर ही आरोप करू नये. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचलो आहेत. फक्त संशयावरून त्यांचाही बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल," असं पत्र पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 28, 2021, 8:21 PM IST

ताज्या बातम्या