मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /PMC बँक घोटाळा: वसई-विरारमध्ये EDची धाड, हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपच्या कार्यालयांमध्ये छापेमारी

PMC बँक घोटाळा: वसई-विरारमध्ये EDची धाड, हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपच्या कार्यालयांमध्ये छापेमारी

ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Fraud) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे.

ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Fraud) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे.

ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Fraud) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे.

वसई, 22 जानेवारी: सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Fraud) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीने या प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या छापेमारीनंतर ठाकुर कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई विरार मध्ये आज सकाळ पासून ईडीचे धाड टाकण्याचे सत्र सुरू होते. वसईतील नामांकित विकासक विवा होम्सच्या कार्यालयावर आणि संचालकांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे अशी देखील माहिती मिळते आहे की, या संचालकांच्या कार्यालयाच्या बाहेर राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

(हे वाचा-PNB ग्राहक असाल तर लक्ष द्या! फेब्रुवारीपासून या ATM मधून काढता येणार नाहीत पैसे)

प्राथमिक माहिती नुसार, HDIL कंपनीचे मालक राकेश वाधवान यांनी ईडीच्या चौकशीत विवा ग्रुप मध्ये त्यांची भागीदारी असल्याचे म्हटले होते. तसेच PMC बँकेत सफाळे पालघर याठिकाणचे नामांकित विकासक प्रवीण राऊत यांच्या चौकशीत विवा ग्रुपचे व्यवहार असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळते आहे.

First published:
top videos