Home /News /explainer /

Explainer: विजेच्या आधारे घरातच ऑक्सिजन निर्मिती कशी करतात?

Explainer: विजेच्या आधारे घरातच ऑक्सिजन निर्मिती कशी करतात?

देशात कोरोनाचे (Corona) संक्रमण वेगाने वाढत असून, अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनची (Medical Oxygen)कमतरता भासत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

    मुंबई, 20 एप्रिल: देशात कोरोनाचे (Corona) संक्रमण वेगाने वाढत असून, अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता भासत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या नोंदी होत आहेत. खरं पाहिलं तर या वातावरणातही उपलब्ध ऑक्सिजन हा पुरेसा आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. अशा वेळी हवेतील ऑक्सिजनऐवजी मेडिकल ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे ऑक्सिजनच्या विविध पर्यायांबाबत चर्चा होत आहे. मेडिकल ऑक्सिजनची कोणाला गरज असते सर्वप्रथम जाणून घेऊया की, कोणाला या ऑक्सिजनची आवश्यकता आहे किंवा त्याची आवश्यकता असू शकते. अस्थमा, क्रॉनिक ब्राँकायटिस, कन्जेस्टिव हार्ट फेल, सिस्टीक फायब्रोसिस, फुफ्फुसाचा कॅन्सर, पल्मोनरी फायब्रोसिस किंवा स्लिप एप्निया यांसारखे आजार असलेल्या रुग्णाला या ऑक्सिजनची गरज भासते. कोणता आजार असलेल्या रुग्णाला प्रत्येक मिनीट किती ऑक्सिजन गरज भासते, हे डॉक्टरांद्वारे ठरवले जाते. ज्या लोकांना झोपेवेळी श्वास घेण्यास त्रास होतो त्यांना झोपेच्या वेळी ऑक्सिजन थेरपीची (Oxygen therapy) गरज भासू शकते. अनेकांना व्यायाम करतेवेळी देखील ऑक्सिजनची गरज भासू शकते. काही लोकांना अगदी 24 तास देखील ऑक्सिजनची गरज असते. स्टॅण्डर्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय? सध्या ऑक्सिजनच्या विविध पर्यायांवर चर्चा होत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. याला स्टॅण्डर्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Standard Oxygen Concentrator) देखील म्हटलं जातं. या मशीनमध्ये एक मोटार असते, जी वीजेवर चालते. वेळप्रसंगी ही मोटार बॅटरीवर देखील चालवली जाते. ती हवेतून ऑक्सिजन घेते आणि बाकी गॅसेस बाहेर काढून टाकते. ही मशीन जवळपास 50 पौडांची असते आणि ने-आण करण्यासाठी या मशीन खाली चाके लावलेली असतात. कोणते उपकरण आवश्यक असतात हा कॉन्सन्ट्रेटर ऑक्सिजन सिलेंडरच्या धर्तीवर काम करतो. रुग्णाच्या नाकावर कॅन्युला किंवा मास्क लावून त्याला यातून ऑक्सिजन दिला जातो. ऑक्सिजन सिलेंडर मध्ये ठराविक प्रमाणात ऑक्सिजन असतो. मात्र कॉन्सन्ट्रेटर हवेच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती करुन तो रुग्णाला दिला जातो. जर वीजपुरवठा खंडीत झाला आणि रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली तर ही यंत्रणा बॅटरीवर देखील चालते. पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही एक वेगळी मशीन असते. त्याला पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Portable Oxygen Concentrator) असे म्हणतात. जेव्हा तुम्ही काही काम करत असता तेव्हा ही यंत्रणा सहज घेऊन जाता येते, त्यामुळे हा एक उत्तम पर्याय ठरतो. याचे वजन 3 ते 20 पौंड असते. त्यामुळे ही यंत्रणा सहज उचलता येऊ शकते. यातील काही यंत्रे अशी आहेत, जी कार प्लग-इनच्या आधारे चार्ज केली जाऊ शकतात. यामुळे घराबाहेर असाल तरी ऑक्सिजन दिला जाऊ शकतो. ऑक्सिजन घेण्याचे हे पर्याय असताना रुग्णाला ऑक्सिजन देण्यासाठी काही गोष्टी देखील आवश्यक असतात, यापैकी एक असतो तो नोजल कॅन्युला (Nozzle Cannula). ही एक प्लॅस्टीकची नळी असते. त्याच्या दोन्ही बाजू जोडता येऊ शकतात. ही रुग्णाच्या नाकाला फिट बसते तर तिची दुसरी बाजू ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या यंत्रणेला जोडलेली असते. नोजल कॅन्युलाच्या माध्यमातून रुग्णाला आरामशीर ऑक्सिजन मिळू शकतो. मात्र त्याच्या वापरामुळे नाकात थोडासा कोरडेपणा जाणवतो. फेस मास्क (Face Mask) हा देखील एक पर्याय आहे. तो नाक आणि तोंड दोन्ही कव्हर करतो. जेव्हा रुग्णाला हाय लेव्हल ऑक्सिजनची गरज असते तेव्हा फेसमास्क वापरला जातो. मात्र हा वापरताना रुग्णाला जेवण करता येत नाही किंवा नीट बोलता येत नाही. या दोन पर्यायांबरोबरच रुग्णाला ट्रान्सटॅक्चियल कॅथेलरच्या माध्यमातून देखील ऑक्सिजन देता येतो. यात एक नळी घशाला लावली जाते. यामुळे ऑक्सिजन थेट एअरवेजमध्ये जातो. त्यामुळे ऑक्सिजन मात्रा कमी प्रमाणात लागते. मात्र यामुळे घशात संसर्ग होण्याची शक्यता असते.
    First published:

    Tags: Corona, Covid-19, Electricity, Oxygen supply

    पुढील बातम्या