• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मोठी बातमी, परमबीर सिंग यांनीच केली होती सचिन वाझेंची शिफारस, पत्र आले समोर

मोठी बातमी, परमबीर सिंग यांनीच केली होती सचिन वाझेंची शिफारस, पत्र आले समोर

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 25 मे 2020 रोजी पत्र लिहून सचिन वाझे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती.

  • Share this:
    मुंबई, 07 एप्रिल: मुंबईत (Mumbai) मायकल रोडवर स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. सचिन वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच दिला होता, हे आता पत्रासह समोर आले आहे. त्यामुळे परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे. सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 25 मे 2020 रोजी पत्र लिहून सचिन वाझे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर सचिन वाझे यांची  गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सिपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझे यांना बंधनकारक होतं.  मात्र, सचिन वाझे हे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या संपर्कात होते. दरम्यान, आज परमबीर सिंग यांना दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेल्या गाडी पार्क प्रकरणी चौकशीला एनआयएची पायरी चढावी लागली. परमबीर सिंग यांच्यासह अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज साधारणपणे सकाळी साडेनऊच्या सुमारास परमबीर सिंग हे चौकशी करता एनआयएच्या मुंबई कार्यालयात हजर झाले एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांना एनआयएनने चौकशी करता समन्स बजावला होता. याच बरोबर त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात देखील आणण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांची चौकशी एनआयएचे उच्चाधिकारी करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published: