परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; सोनू जालान प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग, सूत्रांची माहिती

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; सोनू जालान प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग, सूत्रांची माहिती

परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल तक्रारींनंतर एका प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मे: मुंबईचे माजी पोलीस माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल एकूण 3 तक्रारींपैकी एका प्रकरणाचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (ACB)कडून सीआयडी (CID)कडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर इतर दोन तक्रारींप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपली गोपनीय चौकशी करणार आहे.

पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे, पोलीस, निरीक्षक अनुप डांगे आणि व्यावसायिक सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमवीर सिंग यांच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी) करत असलेला तीन गोपनीय चौकशी पैकी सोनू जालान प्रकरणातील गोपनीय चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. खंडणीच्या आरोपांसह इतर भ्रष्टाचार प्रकरणाचा तपासही सीआयडी करणार आहे.

वाचा: दुसऱ्याच्या युट्यूब अकाऊंटमधून 23 लाख रुपये गायब,औरंगाबादच्या पठ्यामुळे गुगल कोमात!

तर उर्वरित दोन प्रकरणांमध्ये गोपनीय चौकशी एसीबी करणार आहे त्यात अनुप डांगे व बी. आर. घाडगे यांच्या तक्रारींचा समावेश आहे.

परमबीर सिंग याच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अकोल्यातील सिटी कोतवाल पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण आता ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 12, 2021, 4:20 PM IST

ताज्या बातम्या