दुसऱ्याच्या युट्यूब अकाऊंटमधून 23 लाख रुपये गायब,औरंगाबादच्या पठ्यामुळे गुगल कोमात!

दुसऱ्याच्या युट्यूब अकाऊंटमधून 23 लाख रुपये गायब,औरंगाबादच्या पठ्यामुळे गुगल कोमात!

गुगलकडे देखील याबाबत उत्तर नाही, पोलीस आणि गुगल ललितच्या या कारनाम्याने हैराण झाले असून गुगलला ललितने गंडा कसा घातला?

  • Share this:

मुंबई, 12 मे: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल (Google) आणि जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म असलेल्या युट्युबला (Youtube) औरंगाबाद (Aurangabad) येथील एका तरुणाने चक्क 23 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. धक्कादायक म्हणजे, औरंगाबाद येथील या तरुणाने गुगुलला कसा काय चुना लावला? याचा उलघडा अजूनही पोलीस करू शकले नाही. पण बॅंक खात्याच्या माहितीच्या आधारे मुंबईतील समता नगर सायबर सेलने औरंगाबाद येथून ललित देवकर (Lalit Devkar) नावाच्या या तरुणाला अटक केली आहे.

प्रसिद्ध युट्युबर आणि फिल्म प्रोड्युसर आशिष भाटिया (Ashish Bhatia youtube channel) हे युट्युबर व्हिडिओ अपलोड करत असतात. त्या बदल्यात त्यांना युट्युब आणि गुगलकडून महिन्याला किमान 20 ते 23 लाख रुपये मानधन मिळते. मात्र, या महिन्यात आपले मानधन का आले नाही हे आशिष यांनी गुगलला विचारले असता त्यांनी पैसे आशिष भाटीया यांच्या बॅंक खात्यात पाठवल्याचे पुरावे दिले. यामुळे आशिष भाटिया यांच्या पायाखालची वाळू सरकली.

गुगलने ज्या बॅंक खात्यात पैसे वळते केले होते त्या खात्याची माहिती आशिष यांनी घेतली तेव्हा आशिष यांच्या लक्षात आले की त्यांचे बॅंक खाते ब्लॉक करण्यात आलं आहे. आशिष भाटीया यांनी याबाबत तात्काळ समता नगर सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. आशिष यांच्या तक्रारीनुसार, समता नगर सायबर पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी विवेक कनवाजे, एपीआय संजय पवार, पोलीस नाईक अशोक शिंदे आणि मुन्ना तांबोळी यांची एक टीम बनवली आणि तपास सुरू केला.

सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांवर पुन्हा दाखवला विश्वास,सोपवली महत्त्वाची जबाबदारी

सर्वात आधी आशिष भाटिया यांचे पैसे कोणत्या खात्यात गेलेत याची माहिती या पथकाने घेतली आणि त्या खात्याचे KYC तपासले असता ज्या दोन बॅंक खात्यात आशिष भाटिया यांचे पैसे वळते करण्यात आले होते, ते बॅंक खाते ललित देवकर या तरुणाच्या नावे असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. तर ललित देवकर हा उच्च शिक्षित तरुण असून मेकेनिकलमध्ये पदवीधर आहे आणि ललित देवकर हा सुद्धा युट्युबर आहे.

ललितने त्याचे दोन बॅंक खाते उघडले होते ज्या मार्फत त्याने आशिष भाटिया यांचे पैसे उडवले होते. ज्या खात्यात आशिष भाटिया यांचे पैसे वळते केले गेले, ते बॅंक खाते ललित याच्या नावे असल्याने पोलिसांनी ललितला अटक केली. तर चौकशी दरम्यान आपणच हे अकाऊंट हॅक केले असल्याचे ललितने कबूल केले आहे, असा दावा पोलिसांनी केला. मात्र, त्याने ही हॅकिंग कशी केली? याबाबत कोणताही खुलासा पोलीस करु शकले नाही.

मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, 'इस्रायल दहशतवादी देश'

एवढंच नाही तर गुगलकडे देखील याबाबत उत्तर नाही, पोलीस आणि गुगल ललितच्या या कारनाम्याने हैराण झाले असून जगातील सर्वात मोठ्या आणि अतिसुरक्षित गुगलला ललितने गंडा कसा घातला हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. ललितला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

Published by: sachin Salve
First published: May 12, 2021, 1:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या