राहुल पाटील (पालघर), 02 मार्च : दहा वर्षीय अल्पवयीन चिमुकल्या मुलीची शाळेत जात असताना अपहरण करून आधी लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर निर्घुन हत्या करण्यात आली होती. दरम्यान या आरोपीला तलासरी पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत अटक केली आहे. दरम्यान ही घटना तलासरी येथील डोंगरी या भागातील घटना आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तलासरीतील डोंगरी येथील दहा वर्षीय चिमुकली शाळेत जात असताना अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मोपेडवरून तिचं एका 45 वर्षीय आरोपीने अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह महाराष्ट्र, गुजरात सीमेलगत संजान भिलाड मार्गालगत एका जंगलात फेकून देण्यात आला होता.
तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांकडून या चिमुकलीचा शोध सुरू करण्यात आला. संशयावरून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून चौकशी अंती आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
VIDEO: भररस्त्यात गर्लफ्रेंडला मारहाण करत होता तरुण; बचावासाठी मध्ये पडला साऊथ स्टार अन...
पीडित चिमुकलीचे आजोबा आणि आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद असून त्याच्यातून आरोपीने हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलीस तपासात दिली आहे. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 , 376 , पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तलासरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती तलासरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news, Palghar, Rape news, Rape on minor