मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Cyclone Tauktae मुळे मुंबईच्या समुद्रात बुडालेले P305 बार्ज अखेर सापडले

Cyclone Tauktae मुळे मुंबईच्या समुद्रात बुडालेले P305 बार्ज अखेर सापडले

 तेलउत्खनंन प्रकल्पाच्या शेजरीच समुद्रात 3 नांगर टाकुन उभा असलेला बार्ज P305 उसळलेल्या लाटांमुळे जोरदार हेलखावे खाऊ लागला होता.

तेलउत्खनंन प्रकल्पाच्या शेजरीच समुद्रात 3 नांगर टाकुन उभा असलेला बार्ज P305 उसळलेल्या लाटांमुळे जोरदार हेलखावे खाऊ लागला होता.

तेलउत्खनंन प्रकल्पाच्या शेजरीच समुद्रात 3 नांगर टाकुन उभा असलेला बार्ज P305 उसळलेल्या लाटांमुळे जोरदार हेलखावे खाऊ लागला होता.

मुंबई, 23 मे : तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) भक्षस्थानी सापडलेले मुंबई हाय जवळ समुद्रात बुडालेल्या P305 या बार्जचा शोध अखेर लागला आहे. अरबी समुद्रात खोल समुद्राच्या पोटात 30 मीटर अंतरावर नौदलाच्या INS मकर या युद्धनौकेने अत्याधुनिक सोनार रडारच्या सहाय्याने या बार्जचा शोध लावला आहे.

मागील रविवारी दुपारी 'तौत्के' चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्याप्रमाणात सुरू झाला होता. त्यावेळी मंबई हाय या तेलउत्खनंन प्रकल्पाच्या शेजरीच समुद्रात 3 नांगर टाकुन उभा असलेला बार्ज P305 उसळलेल्या लाटांमुळे जोरदार हेलखावे खाऊ लागला होता. अजस्त्र लाटा बार्जच्याही वरून जाऊन तडाखे देऊ लागल्या होत्या. त्यामुळे बार्जचे तीनही नांगर तुटले आणि जवळच्याच मुंबई हाय तेलउत्खनंन प्रकल्पाच्या मोठ्या खांबाला धडकले. त्यामळे बार्ज तीरपा होऊन बूडू लागला.

एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते जगातील सर्वात महागडी आणि चवदार कॉफी!

त्यावेळी बार्जवरील घाबरलेल्या 261 लोकांपैकी काहींनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. पण उधाणलेल्या समुद्रात ते दूरवर वाहून गेले. आणि त्यातच त्यांचा मृत्यूही झाला. आतापर्यत 66 जणांचे मृतदेह सापडलेत तर उर्वरीत बेपत्ता 9 लोकांचा शोध अजूनही नौदलाचे जवान घेत आहेत. नौदलाने आतापर्यंत 186 लोकांना या दूर्घटनेतून वाचवले आहे.

रायगडमध्ये सापडले 5 जणांचे मृतदेह

दरम्यान, रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत समुद्र किनाऱ्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. अलिबाग तालुक्यात शनिवारी 4 मृतदेह आढळून आले आहेत तर शुक्रवारी रात्री एक मृतदेह आढळून आला. मुरुड, नवगाव, आवास आणि दिघोडी या समुद्र किनाऱ्यांवर आज चार मृतदेह आढळून आले आहेत. हे पाचही मृतदेह पुरुषांचे आहेत. समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेले हे मृतदेह पुरुषांचे असून तौत्के चक्रीवादळाच्या दरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या बोटीतील हे मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बार्जच्या कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल

हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. चक्रीवादळाची सूचना असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या  मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कठीण काळात कोणीही नव्हतं पण ती खंबीरपणे मागे उभी होती'; अभिनेता म्हणाला...

कॅप्टन बल्लव यांच्या विरोधात कलम 304 (2), कलम 338 आणि कलम 334 अन्वये सदोष मनुष्यवध तसेच बेजबाबदारपणे वैयक्तिक सुरक्षिततेस धोको पोहोचवणे, गंभीर दुखापतीला जबाबदार असणे आणि विशिष्ट हेतू न ठेवता हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: