मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण, 49 जणांच्या मृत्यू प्रकरणात कॅप्टनवर गुन्हा दाखल

P-305 बार्ज दुर्घटना प्रकरण, 49 जणांच्या मृत्यू प्रकरणात कॅप्टनवर गुन्हा दाखल

 P-305 बार्ज दुर्घटना प्रकरणात 49 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण बेपत्ता आहे. हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

मुंबई, 21 मे : तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. या चक्रीवादळात  समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P-305 बार्ज (P-305 Barge)  बुडाले. या अपघातामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण बेपत्ता आहे. हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. चक्रीवादळाची सूचना असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या  मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कॅप्टन बल्लव यांच्या विरोधात कलम 304 (2), कलम 338 आणि कलम 334 अन्वये सदोष मनुष्यवध तसेच बेजबाबदारपणे वैयक्तिक सुरक्षिततेस धोको पोहोचवणे, गंभीर दुखापतीला जबाबदार असणे आणि विशिष्ट हेतू न ठेवता हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

का झाली दुर्घटना?

हा अपघात झाला तेव्हा बार्जमध्ये उपस्थित असलेले कर्मचारी रेहमान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, " चक्रीवादळाच्या धोक्याच्या संदर्भात सूचना देऊनही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कंत्राटदार एफकॉन्स कंपनी आणि कॅप्टन बल्लव जबाबदार आहेत.

बार्जवर चीफ इंजिनिअर असलेले रेहमान शेख यांना नौदलाच्या जवानांनी खोल समुद्रात जखमी अवस्थेत तरंगताना वाचवलं आणि सुखरूप मुंबईत आणलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेहमान शेख यांचे भाऊ आलम शेख हे सुद्धा दुसऱ्या बोटीवर इंजिनिअर आहेत.

आलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी बार्ज परत आणण्याची विनंती केली होती. मात्र या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले.'

दुर्दैवी! पंजाबमध्ये भारतीय वायूसेनेचे Mig-21 Bison क्रॅश, पायलटचा मृत्यू

P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले.ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन या सर्वांचा जीव वाचवला आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अजूनही सुरु आहे.

First published:

Tags: Cyclone, Maharashtra, Mumbai