मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'Corona Vaccine पुरवा, 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम फत्ते करतो,' मुंबईच्या महापौरांचे आवाहन

'Corona Vaccine पुरवा, 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम फत्ते करतो,' मुंबईच्या महापौरांचे आवाहन

Mumbai Vaccination Drive कोरोना लसीकरणासाठी मिळणारा साठा पुरेसा नसल्यानं योग्य प्रमाणात लसीकरण होत नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Mumbai Vaccination Drive कोरोना लसीकरणासाठी मिळणारा साठा पुरेसा नसल्यानं योग्य प्रमाणात लसीकरण होत नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Mumbai Vaccination Drive कोरोना लसीकरणासाठी मिळणारा साठा पुरेसा नसल्यानं योग्य प्रमाणात लसीकरण होत नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 मे : कोरोनाचा वाढता संसर्ग (Coronavirus) थांबवणे आणि भविष्यातील कोरोना लाटांची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण (Vaccination) हे अत्यंत गरजेचं आहे. पण सध्या राज्यात लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. 18-44 वयोगटातील नागरिकांना केलं जाणारं लसीकरण तर नावालाच आहे. लसीच्या तुटवड्यामुळं (Vaccine Shortage) वेगानं लसीकरण होत नसल्याची तक्रार मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली आहे. तसंच लस उपलब्ध करून दिल्यास 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करूनही लसीकरण करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

(वाचा-महाराष्ट्र: रुग्णसंख्या 50 लाखांजवळ, 10 जिल्ह्यात ग्रोथ रेट घसरल्याने दिलासा)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीनं लस पुरवठा होत आहे, तो अत्यंत कमी आहे. राज्याचा विचार करता महाराष्ट्र सरकारला लसींचा जो साठा दिला जातो, त्यापैकी सर्वाधिक साठा मुंबईसाठी मिळतो. मात्र मुंबईत आम्हाला उपलब्ध होणारा लसींचा साठाही अत्यंत कमी पडत आहे. आम्हाला जर सरकारनं मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिला तर आरोग्य कर्मचारी 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम पूर्ण करतील, अशी तयारीही किशोरी पेडणेकर यांनी दाखवली आहे.

(वाचा-आता कोरोना रुग्णांसाठी मोबाइलवर बुक होणार खाटा; मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं APP)

1 मेपासून 18-44 वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली. पण प्रत्यक्षात या गटासाठी लागणारा लसीचा मोठा साठा उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राज्यात तर सध्या 45 च्या पुढील वयोगटातील अनेकांच्या दुसऱ्या डोसचाही तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळं राजेश टोपे यांनी 18-44 वयोगटातील नागरिकांसाठीचा लशीचा वापर या वयोगटासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही लसीकरणासाठी मोजक्याच केंद्रांवर लसींचा साठा उपलब्ध असल्याने लसीकरण मोहीम मंदावल्याचं चित्र आहे.

कोरोनाला आळा घालायचा असेल तर लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे. त्यासाठी अगदी 24 तास करण्याची तयारीही मुंबईच्या महापौरांनी दाखवली आहे. मात्र सरकारडून लसींचा जास्तीत जास्त साठा पुरवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Mumbai