मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मेट्रोच्या प्रवाशांसाठी वन मुंबई मेट्रो कार्डची नवी सुविधा, प्रवासासह अन्य सुविधा देणारे एकमेव कार्ड

मेट्रोच्या प्रवाशांसाठी वन मुंबई मेट्रो कार्डची नवी सुविधा, प्रवासासह अन्य सुविधा देणारे एकमेव कार्ड

Mumbai Metro Service:काही प्रमाणात गर्दी टाळणं शक्य व्हावं यासाठी मेट्रोनं (Mumbai Metro) एक पुढाकार घेतला आहे.

Mumbai Metro Service:काही प्रमाणात गर्दी टाळणं शक्य व्हावं यासाठी मेट्रोनं (Mumbai Metro) एक पुढाकार घेतला आहे.

Mumbai Metro Service:काही प्रमाणात गर्दी टाळणं शक्य व्हावं यासाठी मेट्रोनं (Mumbai Metro) एक पुढाकार घेतला आहे.

मुंबई, 09 जुलै:  सध्याच्या काळात गर्दी टाळणं, सुरक्षित सामाजिक अंतर पाळणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मात्र मुंबईसारख्या (Mumbai) ठिकाणी लाखो लोक दररोज कामासाठी लोकल, मेट्रोनं प्रवास करतात. त्यांना या गोष्टी पाळणं तसं कठीण आहे. हे लक्षात घेऊन प्रवास करताना त्यांना काही प्रमाणात गर्दी टाळणं शक्य व्हावं यासाठी मेट्रोनं (Mumbai Metro) एक पुढाकार घेतला आहे. मेट्रो प्रवाशांना संपर्क रहित प्रवास करता यावा या उद्देशानं मास्टरकार्ड, मुंबई मेट्रो आणि अ‍ॅक्सिस बँकेनं ‘वन मुंबई मेट्रो कार्ड’ (One Mumbai Metro Card) दाखल केलं आहे. हे प्री-पेड, कॉन्टॅक्टलेस कार्ड असून यामुळं मेट्रो प्रवाशांना कॅशलेस आणि संपर्क रहित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कार्डची वैशिष्ट्ये :

हे कार्ड मुंबईतील मेट्रो स्टेशन काउंटरवर उपलब्ध असून, एकदा हे कार्ड घेतल्यानंतर प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळं गर्दी टाळणं काही प्रमाणात शक्य होईल, वेळही वाचेल. हे कार्ड अत्यंत सुरक्षित असून, अगदी सहजपणे वापरता येऊ शकतं. यामध्ये टॉप अपची (Top Up) सुविधा आहे. या कार्डचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त रोजच्या प्रवासासाठीच नाही तर खरेदीसाठीही (Shopping) वापरता येणार आहे. या कार्डचा उपयोग करून लोक आवश्यक गोष्टी, औषधे यांची खरेदी करू शकतील. हे एक कार्ड दैनंदिन प्रवासाबरोबर आवश्यक खरेदीसाठीही उपयुक्त ठरणार असल्यानं लोकांना एका कार्डद्वारे अनेक कामं करण्याची सोय होणार आहे.

हेही वाचा- थोरात-राऊतांच्या दिल्लीवारीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया 

‘भारतात सुरक्षित डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टात योगदान देण्याची मास्टरकार्डची (Mastercard) इच्छा असून, देशातील परिवहन यंत्रणेच्या डिजिटायझेशनसाठीही (Transport Digitization) मास्टरकार्ड सहकार्य करत आहे. अशा डिजिटल सुविधा उपलब्ध करून लोकांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी मास्टरकार्ड सदैव तत्पर असेल,’ असं कंपनीनं म्हटलं आहे.

मुंबईकरांसाठी वन मुंबई मेट्रो कार्ड सुरू करणे ही आनंदाची बाब असून, सर्व प्रवासी हे कार्ड वापरतील, अशी आशा मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल (सेवानिवृत्त) शुभोदय मुखर्जी यांनी व्यक्त केली.

‘भारत कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वेगानं पुढे जात असून, अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्यात अ‍ॅक्सिस बँकेनं (Axis Bank) नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. या वन मुंबई मेट्रो कार्डमुळे प्रवाशांना डिजिटल पेमेंट सिस्टीम वापरण्यास अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुंबई मेट्रो वन आणि मास्टरकार्डशी जोडले गेल्याचा आम्हाला अभिमान आहे,’ अशी भावना अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि कार्डे व पेमेंट्स विभागाचे प्रमुख संजीव मोघे यांनी व्यक्त केली.

First published:
top videos

    Tags: Metro, Mumbai