मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /निकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

निकालाबद्दल आश्चर्य नाही, बाबरी प्रकरणावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : तब्बल 28 वर्षांनंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Demolition Case) आज  सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व 32 आरोपींची मुक्तता केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूज18 लोकमतशी बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बाबरी विध्वंस प्रकरणाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. 'देशातील न्यायालयांकडून निर्णय येतात. त्यावरून आश्चर्य  नाही. या घटनेचे सगळीकडे व्हिडिओ आहे. तरी पुरावे नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या  या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही', असं मलिक म्हणाले.

दरम्यान, आज लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. यावेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत 18 आरोपी कोर्टात उपस्थित होते. तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टाने यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

याआधी सेशन ट्रायल क्रमांक 344/1994, 423/2017 आणि 726 / 2019 सरकार विरुद्ध पवन कुमार पांडे आणि वरील प्रकरणातील सर्व सुनावणी 16 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर सुरेंद्र कुमार यादव, पीठासीन अधिकारी, विशेष न्यायालय, अयोध्या केस लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय देण्याची तारीख निश्चित केली. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, त्यापैकी 32 सध्या जिवंत आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. जण मरण पावले आहेत. या खटल्यात भाजप नेते एल के अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांची आरोपी म्हणून नावं होती.

हे होते बाबरी मशीद प्रकरणातील 32 आरोपी

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.

First published: