जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क माफ

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क माफ

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क माफ

तत्कालीन युती सरकारच्या काळात ही करमणूक शुल्कमाफी वादग्रस्त ठरली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जानेवारी : पॉप गायक मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम करणाऱ्या विझक्राफ्ट या कंपनीला शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या (Thackeray government ) बैठकीत घेण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर 1996  मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. शिव उद्योग सेनेचा निधी उभारण्यासाठी शिवसेनेने मुंबईत पॉप गायक मायकेल जॅक्सन यांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी या कार्यक्रमाची खूप चर्चा झाली होती. विझक्राफ्ट या कंपनीने जॅक्सन यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ‘बिट म्युझिक’ साठी हा मनोरंजन कर माफ होता. पण पॉप म्युझिकसाठी मनोरंजन कर माफ नसताना तो माफ करण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारच्या काळात घेण्यात आला. त्यावेळी ग्राहक पंचायतीतर्फे अॅड शिरीष देशपांडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी 3 कोटी 33 लाख रूपये बँकेत ठेवण्यात आले होते. (Entertainment fee waiver for pop singer Michael Jacksons) आता तब्बल 24 वर्षानंतर सुनावणी होऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारने आयोजक कंपनीस करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. आज सकाळी ग्राहक पंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे ही शुल्कमाफी देऊ असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं होतं. हे ही वाचा- मोठी कारवाई; माजी उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड काय आहे प्रकरण? बेरोजगारांना नोकरी आणि इतर गोष्टींसाठी युती सरकार आल्यानंतर राज ठाकरे यांच्या पुढाकाराने शिवउद्योग सेनेची स्थापना करण्यात आली होती. यावेळी जॅक्सन यांच्या कार्यक्रमाची बरीच चर्चा होती. त्यावेळी युती सरकारने या कार्यक्रमावरील करमणूक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यावर मुंबई ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात