Home /News /mumbai /

नितेश राणेंनी केली उद्धव ठाकरेंची हनुमानाशी तर शरद पवारांची रामाशी तुलना, लोकं म्हणाले...

नितेश राणेंनी केली उद्धव ठाकरेंची हनुमानाशी तर शरद पवारांची रामाशी तुलना, लोकं म्हणाले...

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे याची तुलना हनुमानाशी केली आहे. तर शरद पवारांची तुलना ही प्रभू रामाशी केली आहे.

    मुंबई, 23 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. याही परिस्थितीत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त फोटो ट्वीट केला आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांना हनुमान म्हणून दाखवण्यात आलं आहे.  हनुमानाच्या छातीत ज्या प्रकारे श्रीराम आणि सीता मातेचा फोटो दिसला होता, त्या जागी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. एका प्रकार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची थेट हनुमानाशी तुलना केली आहे. तर शरद पवार यांची प्रभू रामाशी तुलना केली आहे. नितेश राणे यांनी हा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करण्यात आलेला असल्याचं सांगितलं आहे. तसंच,' बाळासाहेब ठाकरे कुठे आहे?' असा सवालही उपस्थितीत केला आहे. परंतु, नितेश राणे यांनी हा फोटो ट्वीट करून ट्वीटर युझर्सची नाराजी ओढावून घेतली आहे. 'पवनसूत हनुमान आणि प्रभू श्रीरामाच्या जागी इतर चेहरे लावून हिंदू धर्मीयांच्या भावनेला हात घालू नका, हिंदूच्या भावना दुखावू नका', असा इशाराच राणेंनी देण्यात आला आहे.' गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आणि निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वीच निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्वीटवर शाब्दिक चकमक उडाली होती. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Nitesh rane, Rane, Tweet, नितेश राणे

    पुढील बातम्या