Home /News /mumbai /

Night curfew Maharashtra : उद्यापासून काय राहणार बंद, काय सुरू? पाहा संपूर्ण नियमावली

Night curfew Maharashtra : उद्यापासून काय राहणार बंद, काय सुरू? पाहा संपूर्ण नियमावली

राज्य सरकारने (mva government)रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी (night curfew Maharashtra) लागू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने (mva government)रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी (night curfew Maharashtra) लागू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने (mva government) रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी (night curfew Maharashtra) लागू करण्यात आली आहे.

    मुंबई,08 जानेवारी :  राज्यात कोरोना (corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omaicron ) रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने (mva government)रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी (night curfew Maharashtra) लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी असणार आहे.  उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू होईल. तर राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. अशी आहे नवीन नियमावली हे राहणार बंद - स्विमिंग पूल, जिम, स्पॉ, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद - सलून रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद - मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, किल्ले, वस्तूसंग्राहलय, स्नानिक पर्यंटन केंद्र पुर्णपणे बंद राहतील. हे राहणार सुरू - ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह, सिनेमागृह सुरू राहणार - राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद,  दिवसा ५० टक्के क्षमतेने सुरू रहणार. - बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक - हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. - हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार - विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान  असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल. -  सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा  खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल. - अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल - सलून रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५०% क्षमते सुरू राहतील. - शॉपिंग मॉल रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद. दिवसा ५०% क्षमतेने सुरू राहतील. तेही फक्तं ज्यांचे दोन्ही लसीकरण पुर्ण झालेत अशाच लोकांसाठी. - कार्यालयं २४ तास सुरू ठेवून कर्मचाऱ्यांना विविध शिफ्टमध्ये कार्यरत करण्याची सूचना. जेणे करून कार्यालयात गर्दी होणार नाही. - विमानतळ, रेल्वे, बसमधून फक्त ज्यांना तिकीट मिळाले आहे त्यांनाच प्रवासाची अनुमती
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या