जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mansukh hiren death :मनसुख हिरेन प्रकरणाचं गूढ कायम, अहवालातून समोर आली नवी माहिती

Mansukh hiren death :मनसुख हिरेन प्रकरणाचं गूढ कायम, अहवालातून समोर आली नवी माहिती

Mansukh hiren death :मनसुख हिरेन प्रकरणाचं गूढ कायम, अहवालातून समोर आली नवी माहिती

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं (Mansukh Hiren Death Case) गूढ अद्यापही कायम आहे. अहवालातून आता अशी माहिती समोर आली आहे, की मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 जून : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं (Mansukh Hiren Death Case) गूढ अद्यापही कायम आहे. अहवालातून आता अशी माहिती समोर आली आहे, की मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही. यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या (NIA) अनेक दिवसांपासून तपास करत आहे. याधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या टीमकडे आला होता. हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे. पण, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल सवाल उपस्थितीही केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात