मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी! मुंबईत आजपासूनच लागू होणार नवे निर्बंध; महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला इशारा

मोठी बातमी! मुंबईत आजपासूनच लागू होणार नवे निर्बंध; महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला इशारा

मुंबईत आजपासूनच नवे निर्बंध लागू (New Guidelines in Mumbai) होण्याची शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शनिवार किंवा रविवारच्या आधीच नवीन नियम लागू करावे लागणार आहेत.

मुंबई 19 मार्च : राज्यात आणि विशेषतः मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases In Mumbai) पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी आलेल्या आकड्यांनी चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी चोवीस तासात 25833 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार आहे. हे निर्बंध सोमवारपासून लागू होतील अशी माहिती मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती. मात्र, आता आजपासूनच हे निर्बंध लागू (New restrictions in Mumbai) होण्याची शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ही चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे शनिवार किंवा रविवारच्या आधीच नवीन नियम लागू करावे लागणार आहेत. बाजार, मॉल आणि पब पाठोपाठ समुद्र किनाऱ्यावर लोक गर्दी करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे, तिथेही नियम कडक करावे लागणार आहेत. लोक रात्रभर समुद्र किनारी गर्दी करत आहेत. याच कारणांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होत आहे. त्यामुळे, आज संध्याकाळपर्यंत नवीन नियम लागू करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

याशिवाय लोकांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की कोणालाही लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही. मात्र, लॉकडाऊनची गरज पडणार की नाही हे पूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे.

शहरात गुरुवारी दिवसभरात उच्चांकी 2,877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा सात ऑक्टोबरच्या उच्चांकी 2,848 संख्येपेक्षा जास्त आहे. राज्यात गुरुवारी चोवीस तासात 25833 कोरोना रुग्णांची नोंद झाली. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याची तयारी सुरू झाली असून ताबडतोब यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

First published:

Tags: Corona hotspot, Coronavirus, Covid cases, Guidelines, Maharashtra, Mumbai