जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी; व्हायरल क्लिपमध्ये बाबाजीचा उल्लेख

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी; व्हायरल क्लिपमध्ये बाबाजीचा उल्लेख

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे 15 फेब्रुवारी : राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आलीय. आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या नावाचा उल्लेख आहे. पोलिसांनी आहेर यांना ताब्यात घेतलं. मात्र, आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पोलीस ठाण्याच्या बाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काय आहे व्हायरल क्लिपमध्ये? या प्रकरणातील व्हारल ऑडिओ क्लिपमध्ये सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं नाव आलं आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे. या संभाषणात, “माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं. तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवलंय. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवलं आहे. आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो, अस मी क्रीएट करून ठेवलं आहे. वाचा - ‘मी फरार नाही..’ खासदार नवनीत राणांच्या वडिलांची मुंबई सत्र न्यायालयात धाव; पण.. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नातशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केला. तर तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असत? प्लानिंग केलं आहे. तो साप आहे, असं संभाषण या क्लिपमध्ये आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अशा धमक्यांना घाबरत नाही : आव्हाड दरम्यान,  अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे आपणांस माहित आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालिकेच्या गेटवर जावून अधिकारी महेश अहेर यांना मारण्याची धमकी दिली. महेश अहेर यांनी आव्हाडांवर मारण्याची धमकी दिल्यानंतर या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात