'जाणता राजा'वरून राजकारण, उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने दिले असे प्रत्युत्तर

'जाणता राजा'वरून राजकारण, उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने दिले असे प्रत्युत्तर

'जाणता राजा'वरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई,15 जानेवारी:'जाणता राजा'वरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आता राष्ट्रवादीने उदयनराजे भोसले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सातारा पाठोपाठ 'शरद पवार हेच जाणता राजा' अशी पोस्टरबाजी मुंबईतही करण्यात आली आहे. घाटकोपर शहरात ठिकठिकाणी 'शरद पवार हेच जाणता राजा' असे पोस्टर्स झळकले आहेत. राष्ट्रवादीने ही पोस्टरबाजी केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला...

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल, असे कुणी नाही, असेही उदयनराजे म्हणाले होते.

उदयनराजे म्हणाले, कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते, असे सांगत

लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

उदयनराजेंची शिवसेनेवर टीका

पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं, महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आली होती का? अशा शब्दात उदयनराजेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही. महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले आहे.

तुलना केल्याने वाद चिघळला, भाजप बॅकफूटवर

भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

भाजपच्या आयटी सेलचे संजय मयूख यांनीदेखील ट्विटरवरून पुस्तकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मयूख यांचा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात मयूख यांनी म्हटलं आहे की, 'गोयल यांनी हे त्यांचे वैयक्तिक लेखन असून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते मागे घेतो असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाशनही भाजपचे नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2020 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading