• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • NCB ची धडक कारवाई सुरुच, पुन्हा Cordelia क्रूझवर धाड; 8 जण ताब्यात

NCB ची धडक कारवाई सुरुच, पुन्हा Cordelia क्रूझवर धाड; 8 जण ताब्यात

मुंबईत NCB धडक कारवाई सुरुच आहे. आज NCB नं आणखी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 04 ऑक्टोबर: मुंबईत NCB धडक कारवाई सुरुच आहे. आज NCB नं आणखी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. कॉर्डेलिया क्रूझवर ( Cordelia Empress Cruise)आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं पथकानं धाड टाकली. सकाळी क्रूझची पुन्हा एकदा तपासणी झाली. स्वतः एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी ही धाड टाकली आहे. या धाडीत काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ड्रग पेडलर्संना देखील ताब्यात घेतल्याचं समजतंय. शनिवारी एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं. हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद, म्हणाले... या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सुद्धा क्रूझवर होता. त्याला एनसीबीने अटक केली. एनसीबीने या रेव्ह पार्टी प्रकरणात आठ जणांना अटक केली होती. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटींची या पार्टीला हजेरी होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा समावेश होता. हा कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्स पार्टी NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काय घडलं होतं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले. हेही वाचा- ढसाढसा रडत होता आर्यन खान! शाहरुख सोबत बोलला फोनवर एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे. NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते.
  Published by:Pooja Vichare
  First published: