Home /News /mumbai /

Nawab Malik vs NCB: ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर नव्या आरोपांचा बॉम्ब

Nawab Malik vs NCB: ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर नव्या आरोपांचा बॉम्ब

Nawab Malik allegation on NCB: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केला आहे.

    मुंबई, 2 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुन्हा एकदा नवाब मलिकांनी एनसीबीवर (NCB) निशाणा साधला आहे. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) जाहीर केली. ही ऑडिओ क्लिप एनसीबी अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा नवाब मलिकांनी करत एनसीबीवर निशाणा साधला आहे. (Nawab Malik's serious allegation on NCB by releasing audio clip) नवाब मलिक म्हणाले, एनसीबीचा फर्जीवाडा सुरूच आहे. 2021 मध्ये NCB ने खोटे आरोप दाखल केले जात होते असे अनेक मुद्दे बाहेर काढले आहे. मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले आहे. क्रुझवरील रेट नंतर अनेक प्रकरणं पुढे आली. 25 कोटींच्या डीलचा फर्जीवाडा समोर येत आहे. एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यावर सही केली जात आहे. एनसीबीने मोठी वसुली सुरू केली आहे. 2 ऑक्टोबर 2021 क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरू आहे. मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटेडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे. कथित संभाषणाची क्लिप ऐकवत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला आहे. मी कुणालाही घाबरणार नाही नवाब मलिकांनी म्हटलं, तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम केलं. आमच्या घरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मी कुणालाही घाबरणार नाही, मी सगळ्यांची पोलखोल करणार असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. वसुली गँगमध्ये भाजपचा सहभाग? नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, एक आठवड्यापासून बातम्या पेरण्यात येत आहेत की, (समीर वानखेडे) मी एक्सटेन्शन घेणार नाही सुट्टीवर जाणार आहे. पण माझी माहिती आहे की, त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत. सर्व बेकायदेशीर कामे या अधिकाऱ्यांनी केल्याचे रिपोर्ट असतानाही भाजपचे नेते समीर वानखेडेला इथे ठेवण्यात उत्सुक आहेत. म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा सहभाग आहे का? असू द्या... त्यांना इथे ठेवल्याने त्यांचा फर्जीवाडा बाहेर काढण्याची आम्हाला संधी मिळेल. पण ज्या पद्धतीने इतकं होऊनलही हे अधिकारी पंचनामा बदलण्यात व्यस्त आहेत निश्चित रुपाने याबाबत चौकशीसाठी मी स्वत: पत्र लिहिणार आहे. न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाईल. यांच्या विरोधात आणखी काही पुरावे आहेत त्याबाबत टप्प्याटप्प्याने यांचे फर्जीवाडे भविष्यात मी बाहेर काढणार आहे. हे पंचनामा बदलण्यासाठी काम सुरू होतं का याबाबत मला उत्तर हवं आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Nawab malik, NCP

    पुढील बातम्या