मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Nawab Malik: नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांचे डी-गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे - कोर्टाचं निरीक्षण

Nawab Malik: नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांचे डी-गँगसोबत संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे - कोर्टाचं निरीक्षण

नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांनी डी-गँगसोबत मनी लॉन्ड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

नवाब मलिकांचा पाय खोलात? मलिकांनी डी-गँगसोबत मनी लॉन्ड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

Nawab Malik: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहे.

मुंबई, 21 मे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने (ED) अटक केली आहे. या प्रकरणात आता नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसून येत आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये नवाब मलिक यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कोर्टाने सुद्धा मलिकांचे डी गँगसोबत संबंध (Nawab Malik - D gang relation) असल्याचं सकृतदर्शनी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.

मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जागा हडप करण्यासाठी नवाब मलिकांनी थेट आणि जाणीवपूर्वक मनी लॉन्ड्रिंग केल्याचे पुरावे आहेत असं कोर्टाने म्हटलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर आणि सरदार खान यांच्यासोबत अनेकदा भेट घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.

वाचा : "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?"

नवाब मलिकांच्या विरोधातील ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?

नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या साथीने गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे केला. नवाब मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकर या दोघांसोबत अनेकदा बैठक केली. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे एक गाळा अडवून ठेवला.

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा त्याच्यासोबतही बैठका झाल्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी नवाब मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीने गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवला अशी कबुली हसीनाच्या मुलाने दिली आहे. त्यानंतर कालांतराने ही सर्व मालमत्ता नवाब मलिक यांना विक्री करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आपल्या चार्जशिटमध्ये 17 जणांना साक्षीदार केलं आहे. या दोषारोपपत्राची दखल घेत स्पेशल कोर्टाने नवाब मलिक आणि 1993 बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाहवली खान या दोघांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: Dawood ibrahim, ED, Money laundering, Nawab malik