मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नाशिक शिकाऊ डॉक्टर आत्महत्या प्रकरण, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक शिकाऊ डॉक्टर आत्महत्या प्रकरण, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका शिकाऊ डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रश्नाच्या संदर्भात राज्याचे शालेय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका शिकाऊ डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रश्नाच्या संदर्भात राज्याचे शालेय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका शिकाऊ डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रश्नाच्या संदर्भात राज्याचे शालेय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

मुंबई, 18 ऑगस्ट : नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा मृत्यू (Trainee Doctor suspicious death) झाला आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे का यासंदर्भात आता राज्यस्तरावर समितीच्या मार्फत चौकशी (Inquiry ordered) करण्यात येणार आहे, याबाबत शालेय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी माहिती दिली आहे. नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. रॅगिंगच्या प्रकरणातून हा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय झाले आहे याची चौकशी संबंधित राज्‍य स्‍तरावरील वैद्यकीय शिक्षण विभागाची समिती करणार असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले आहे.

अमित देशमुख वैदयकीय शिक्षण मंत्री यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना म्हटले आहे की, नाशिक मेडिकल विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आली नाहीये, पालकांचा म्हणणं आहे आणि महाविद्यालय प्रतिनिधींचं एक म्हणणं आहे. या प्रकरणाची चौकशी शासन स्तरावर घोषित करतो.

रॅगिंग या प्रकारात खूप नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत प्रतिबंध शासनाने घातले आहे, हा दुर्दवी मृत्यू झाला आहे. पोस्टमोर्टम व्हायचं असून पीएम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारणही समोर येईल.

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप

रॅगिंगमुळे आत्महत्या?

डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे याच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच मेडिकल कॉलेजमधील दोन मुलींवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी करण्यात आली आहे.

कॉलेज प्रशासनाकडून आरोपांचे खंडन

स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर कॉलेज प्रशासनाकडून आरोपांच खंडन करण्यात आलं आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याची माहिती कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कॉलेजच्या डीन यांनी न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितले की, स्वप्नीलचे कामात लक्ष लागत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याच्यावर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू होते आम्ही त्याचं समुपदेशन करत होतो. तसेच रॅगिंग प्रकरणी कोणतीही तक्रार नव्हती असंही त्यांनी सांगितलं.

नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होणार?

सांस्कृतिक मंत्री असलेले अनिल देशमुख यांनी नाट्यगृह बंद आहेत ते सुरू करावे या संदर्भात देखील भाष्य करताना म्हटले आहे की, नाट्यगृह चित्रपटगृहकाही अटी शर्ती घालून सुरू करण्याबाबत आम्ही तयार आहोत. पण हा निर्णय सांस्कृतिक विभाग स्तरावर होत नाही. टास्क फोर्स यांचं मत महत्वाचे आहे. आपत्ती निवारण मत देखील आहे. घाई करून काही निर्णय घेत नाही, चर्चा करत आहोत. अभ्यापूर्वक पावलं उचलली पाहिजे, नाट्यगृह, सिनेमा हे बंद असतात व्हेंटिलेशन नसतं. आम्ही परवानगी दिली तिथे हजारो लोक येणं हे संयुक्तिक ठरत नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे, भावनेशी सहमत आहोत हे सुरू करावं तर करावं पण भावनेला मर्यादा घालावं लागतात. एखादा उद्योग अडचणीत आहे ते सुरू व्हावं का? तर हो, पण जीव धोक्यात घालून करावं का? तर नाही. नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतात.

First published:

Tags: Nashik, Nashik suicide